शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

CoronaVirus: लोकसंख्या चौपट असूनही 'या' राज्याची कामगिरी ब्रिटनपेक्षा भारी?; पाहा आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 15:29 IST

coronavirus ब्रिटनच्या तुलनेत कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या अतिशय कमी

लखनऊ: कोरोना संकटासमोर युरोपमधल्या देशांनी अक्षरश: हात टेकल्याचं पाहायला मिळतं आहे. इटली, स्पेन आणि ब्रिटनची अवस्था अतिशय गंभीर आहे. यातल्या ब्रिटन आणि उत्तर प्रदेशची तुलना सध्या आकडेवारीच्या माध्यमातून केली जात आहे. ब्रिटनसारखा विकसित देश रोखू न शकलेलं संकट भारतासारख्या विकसनशील देशातल्या उत्तर प्रदेश राज्यानं रोखल्याचा दावा करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचं क्षेत्रफळ ९३ हजार ९३३ चौरस मैल इतकं आहे. तर ब्रिटनचं क्षेत्रफळ ९३ हजार ६२८ चौरस मैल इतकं आहे. ब्रिटनची लोकसंख्या जवळपास ६.६ कोटी इतकी आहे. तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २३ कोटींच्या घरात म्हणजेच ब्रिटनपेक्षा चौपट आहे. ब्रिटनमधल्या आरोग्य सुविधा अतिशय विकसित आहेत. तर उत्तर प्रदेशातल्या सोयी तितक्याशा चांगल्या नाहीत. मात्र तरीही ब्रिटनच्या तुलनेत उत्तर प्रदेशातल्या कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या अतिशय आहे.ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३ लाख ८२ हजार ६५० जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातल्या ९३ हजार ८७३ जणांना कोरोना झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच जवळपास २५ टक्के व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत १२ हजार १०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १३ टक्के ब्रिटिश नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.उत्तर प्रदेशात बुधवार सकाळपर्यंत १६ हजार ७२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ७०५ जणांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. याचा अर्थ तपासणी करण्यात आलेल्या केवळ ४.२ टक्के जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत केवळ ८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. टक्केवारीचा विचार केल्यास उत्तर प्रदेशातला मृत्यूदर केवळ १ टक्का इतका आहे. मात्र उत्तर प्रदेशातली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना तपासण्या होणं गरजेचं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश