शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:49 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात सर्व मंत्र्‍यांची उपस्थिती बंधनकारक ठेवण्यात आली आहे

लखनौ - उत्तर प्रदेशविधानसभा पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी सभागृहाचं कामकाज २४ तास सुरू राहणार आहे. सकाळी ११ वाजता सुरू झालेले सभागृह १४ ऑगस्टच्या सकाळी ११ पर्यंत सलग सुरू राहील. या काळात भाजपाकडून २८ मंत्र्‍यांना शिफ्टनुसार ड्युटी लावली आहे. ६ शिफ्टमध्ये या मंत्र्‍यांना कामाची वेळ ठरवून दिली आहे. संध्याकाळपासून संपूर्ण रात्र आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत कामकाजाचे वेळापत्रक जारी झाले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात सर्व मंत्र्‍यांची उपस्थिती बंधनकारक ठेवण्यात आली आहे. २८ मंत्र्‍यांचे वेळापत्रक ठरले असून बुधवारी संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ११ पर्यंत हे कामकाज असेल. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत सामान्य विषयावर चर्चा होईल. त्यात सर्व जण सहभागी होतील. त्यानंतर संध्याकाळी ६ ते गुरुवारी सकाळी ११ पर्यंत ६ शिफ्टमध्ये कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात १ शिफ्ट २ तासांची असणार आहे इतर सर्व शिफ्ट ३-३ तासांच्या असतील. 

बुधवारी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत - लक्ष्मी नारायण चौधरी, राकेश सचान, नितीन अग्रवाल, विजय लक्ष्मी गौतम

रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत - योगेंद्र उपाध्याय, कपिल देव अग्रवाल, सतीश चंद्र शर्मा

रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत - अनिल कुमार, दयाशंकर सिंह, दयाशंकर मित्र दयालु, बृजेश सिंह

मध्यरात्री ३ ते पहाटे ६ वाजेपर्यंत - अनिल राजभर, गिरीश चंद्र यादव, बलदेव सिंह, दिनेश खटिक, संजीव गौंड, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, केपी मलिक गुरुवारी सकाळी ६ ते ९ पर्यंत - जयवीर सिंह, नंद गोपाल गुप्ता, संदीप सिंह, रवींद्र जयस्वाल, सोमेंद्र तोमर

सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत - सूर्यप्रताप शाही, संजय सिंह निषाद, गुलाब देवी, रजनी तिवारी

काय आहे कारण?

उत्तर प्रदेशच्या पावसाळी अधिवेशनात या काळात विकसित भारत, विकसित उत्तर प्रदेश २०४७ व्हिजन डॉक्युमेंटवर विशेष चर्चा होणार आहे. जवळपास १७ ते १८ तास सलग ही चर्चा सुरू राहील. व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार राज्याच्या विकासाबाबत व्हिजन सादर करणार आहे. सरकारकडून विधानसभेत १८ तर विधान परिषदेत १८ मंत्री बोलतील. तर चौथ्या दिवशी सभागृहात व्हिजन डॉक्युमेंट्स २०४७ वर मुख्यमंत्री योगी भाष्य करणार आहेत. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशvidhan sabhaविधानसभा