शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा अचानक दिल्ली दौरा; PM मोदी, अमित शाहंची घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:13 IST

योगी आदित्यनाथ लखनौवरून दिल्लीसाठी निघाले आहेत. ते थोड्याच वेळात गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टवर पोहोचतील. योगी दुपारी साधारणपणे एक वाजता दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले.

ठळक मुद्देसीएम योगी आदित्यनाथ यांनी कल लखनौ येथे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बंसल यांच्यासोबत बैठक केली.या बैठकीसाठी सुनील बंसल हे हेलीकॉप्टरने लखनौला पोहोचले होते.सध्या उत्तर प्रदेश भाजपमध्ये विविध प्रकारच्या राजकीय कयासांना उधान आले आहे.

लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्लीत पोहोचत आहेत. ते सायंकाळी चार वाजता गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतील. याशिवाय, काही केंद्रीयमंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ शकतात. यानंतर, ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही भेटू शकतात.

योगी आदित्यनाथ लखनौवरून दिल्लीसाठी निघाले आहेत. ते थोड्याच वेळात गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टवर पोहोचतील. योगी दुपारी साधारणपणे एक वाजता दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले. मोदी-शाह यांच्या सोबतच्या या भेटीत योगींची उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होईल, असे बोलले जात आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील राजकीय घटनाक्रम, उत्तर प्रदेश संघट आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होऊ शकते.

दिल्लीश्वरांसमोर योगी आदित्यनाथांनी दंड थोपटले, पुढे...?

रात्री उशिरापर्यंत स्वतंत्रदेव सिंह आणि सुनील बंसल यांच्याशी बैठक -सीएम योगी आदित्यनाथ यांनी कल लखनौ येथे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बंसल यांच्यासोबत बैठक केली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, ही दर महिन्याला होणारी रुटीन बैठक होती, असे सांगण्यात आले आहे. पण, या बैठकीसाठी सुनील बंसल हे हेलीकॉप्टरने लखनौला पोहोचले होते. ही बैठक आणि सध्या लावले जात असलेले राजकीय कयास, यांसंदर्भात माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीला गेले आहेत, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय, गेल्या एक महिन्यातील घटनाक्रमासंदर्भात बोलायचे झाल्यास उत्तर प्रदेश भाजपमध्ये विविध प्रकारच्या राजकीय कयासांना उधान आले आहे. यातच नुकताच, भाजप आणि आरएसएसच्या काही मोठ्या नेत्यांनीही लखनौ दौरा केला आहे. 

दिल्लीला जाणार का? पंतप्रधान होणार का? योगी आदित्यनाथांनी सांगितल्या 'महत्त्वाकांक्षा'

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा