शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

साधुंच्या हत्येवरून योगी आदित्यनाथ यांचं शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 8:15 AM

बुलंदशहरमधील साधुंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना फोन केला होता

लखनऊ: पालघरपाठोपाठ उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दोन साधुंची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यावरुन आता राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे. साधुंच्या हत्येचं राजकारण न करता कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली. या प्रकरणी कठोर कारवाई करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनदेखील केला होता. आता योगींनी ट्विट करून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.उत्तर प्रदेशची चिंता करू नका. महाराष्ट्र सांभाळा, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं. योगी है तो न्याय है असा हॅशटॅग आदित्यनाथ यांनी वापरला. यानंतर बराच वेळ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. पालघरप्रमाणे बुलंदशहरमध्ये झालेल्या साधुंच्या हत्येचं राजकारण करू नका, असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे भाजपाला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयानं ट्विट्सच्या माध्यमातून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.बुलंदशहरमधील एका शिवमंदिराच्या परिसरात परवा रात्री दोन साधुंची निर्घृण हत्या झाली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं. बुलंदशहरमधील हत्यांचं संबंधितांनी राजकारण करू नये, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं. त्यावर 'संजय राऊतजी, संतांच्या निर्घृण हत्येबद्दल चिंता व्यक्त करणं राजकारण वाटतं का? पालघरमध्ये हत्या झालेले साधू निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. त्यामुळेच उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. आता विचार करा, राजकारण कोण करतंय,' असं योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयानं ट्विटमध्ये म्हटलं.आदित्यनाथ यांच्या कार्यालयानं बुलंदशहर हत्याकांड प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहितीदेखील ट्विटरच्या माध्यमातून दिली. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. इथे कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. बुलंदशहर प्रकरणातही त्वरित कारवाई झाली आणि अवघ्या काही तासांत आरोपी पकडला गेला. महाराष्ट्र सांभाळा. उत्तर प्रदेशची चिंता करू नका,' असं जोरदार प्रत्युत्तर योगींच्या कार्यालयाकडून शिवसेनेला देण्यात आलं. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत