शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल पंचत्वात विलीन, योगींनी अशी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 1:38 PM

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारीही आपल्या निवासस्थानी कोरोनासंदर्भात कोअर टीमची  बैठक घेतली. बैठकीपूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देमोठा मुलगा मानेंद्र सिंह यांनी आनंद सिंह बिष्त यांना मुखाग्नी दिलाऋषिकेश येथील गंगा आणि हेवल नदीच्या संगमावरील फूल चट्टी घाट येथे त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आलेआनंद सिंह बिष्त यांचे सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये निधन झाले होते

लखनौ :मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ हे आपल्या पदाच्या कर्तव्याबरोबरच मुलाचे कर्तव्यही पार पाडत आहेत. त्यांचे वडील आनंद सिंह बिष्त यांचे सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये निधन झाले. यानंतर आज ऋषिकेश येथील गंगा आणि हेवल नदीच्या संगमावरील फूल चट्टी घाट येथे त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा मानेंद्र सिंह बिष्त यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी त्यांची मुले शैलेन्द्र सिंह आणि महेंद्र सिंह यांच्यासह संपूर्ण कुटुंब आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

वडिलांच्या निधनानंतर योगी आदित्य नाथ यांनी त्यांच्या आईला एक भावनीक पत्रही लिहिले होते. तसेच एका योग्याची भूमिका पार पाडत ते कोरोना व्हायरसपासून राज्यातील जनतेला मुक्त करण्याच्या कामालाही लागले. मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी मंगळवारीही आपल्या निवासस्थानी कोरोनासंदर्भात कोअर टीमची  बैठक घेतली. बैठकीपूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांना दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण केली.

वडिलांना दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठकीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

आईला लिहिले भावनिक पत्र -या पत्रत योगी यांनी म्हटले आहे, की 'पूजनीय वडिलांच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. ते माझे जन्मदाता आहेत. आयुष्यात प्रामानिकपणा, कठोर परिश्रम आणि निस्वार्थ तसेच समर्पण भावाने लोक कल्यानाचे कार्य करण्याची शिकवन त्यांनी बालपणी मला दिली. अखेरच्या क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची अत्यंत इच्छा होती. मात्र, जागतीक महामारी कोरोना व्हायरसविरुद्ध देश लढत आहे. त्यात उत्तर प्रदेशच्या २३ कोटी  जनतेची जबाबदारी  माझ्यावर आहे. मी अखेरचे दर्शन घेऊ शकलो नाही. लॉकडाऊन यशस्वी करणे आणि कोरोनाचा पराभव करण्याच्या योजनेमुळे मला अंत्यविधीला येणे शक्य होणार नाही. पूजनीय आई आणि पूर्वाश्रमीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो, की लॉकडाऊनचे पालन करून कमीत कमी लोकांनी अंत्यविधी पार पाडावा. पूजनीय वडिलांच्या स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम करत त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लॉकडाऊननंतर दर्शनासाठी येईन.'

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीDeathमृत्यू