शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

खराब हवामानामुळे ममता बॅनर्जीचे विमान तासभर हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:32 IST

काही काळासाठी विमानतळावरील सर्वच विमान वाहतूक विस्कळीत झाली होती.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाला गुरुवारी कोलकात्यात खराब हवामानाचा मोठा फटका बसला. मुसळधार पाऊस व वेगवान वाऱ्यांमुळे मुख्यमंत्र्यांचे विमान नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू शकले नाही, परिणामी त्यांना तब्बल एक तास हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. या संकटामुळे विमानतळ प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आणि काही काळासाठी विमानतळावरील सर्वच विमान वाहतूक विस्कळीत झाली होती.

आकाशातच घिरट्या

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील अंडाल येथे निवडणूक रॅली आटोपून चार्टर्ड विमानाने कोलकात्याला परतत होत्या. दुपारी ३:३० वाजता अंडाल विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान साधारण ४ वाजता कोलकात्यात लैंडिंग करणे अपेक्षित होते. मात्र, त्याच वेळी कोलकात्यात अचानक हवामान बदलले आणि विजांच्त्या कडकडाटासह पावसाने जोर धरला. दृश्यमानता कमी झाल्याने व वाऱ्याचा वेग वाढल्याने वैमानिकाला लँडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. हवामानात सुधारणा होईपर्यंत मुख्यमंत्र्यांचे विमान तासाभरापेक्षा जास्त वेळ आकाशातच घिरट्या घालत होते. अखेर सायं. ५:१९ वाजता हे विमान धावपट्टीवर उतरले.

१३ लाख 'विचाराधीन' मतदार वगळले

पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान 'विचाराधीन' श्रेणीत ठेवलेल्या ३२ लाख मतदारांची छाननी करण्यात आली असून, त्यापैकी ४० टक्के मतदार वगळण्यात आले, असे निवडणूक आयोगाने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्यक्ष आकडेवारीनुसार, न्यायालयीन प्रक्रियेनंतर वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या सध्या १३ लाख आहे. एसआयआरदरम्यान राज्यातील मतदार यादीतून अंदाजे ६३ लाख नावे आधीच वगळली होती. वगळलेल्या मतदारांची एकूण संख्या ७६ लाख झाली आहे.

तामिळनाडूत प्रचाराला वेग 

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीला महिना शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले असून प्रमुख पक्षांनी आपापल्या रणनीतीला अंतिम रूप दिले आहे. राज्यातील विरोधी पक्ष अण्णा द्रमुकचे जागावाटप जलदगतीने पूर्ण करत प्रचाराला सुरुवात केली असून सत्ताधारी द्रमुक पक्षाविरुद्ध थेट लढतीची तयारी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee's flight circles for an hour due to bad weather.

Web Summary : Due to heavy rain, Mamata Banerjee's flight circled Kolkata airport for an hour. Thirteen lakh voters were excluded from Bengal's voter list after review. Tamil Nadu parties gear up for upcoming elections.
टॅग्स :Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जी