cm mamata banerjee declared that free vaccination will be provided to all above age of 18 years after May 5 | Corona Vaccination: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार; ममता दीदींची घोषणा

Corona Vaccination: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार; ममता दीदींची घोषणा

ठळक मुद्देममता दीदींची मोठी घोषणापश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणारलसींच्या किमतींवरून ममता दीदींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

कोलकाता: देशभरातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असताना, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. दक्षिण दिनाजपूर भागातील एका सभेत जनतेला संबोधित करताना कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. (cm mamata banerjee declared that free vaccination will be provided to all above age of 18 years after May 5)

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ५ मेपासून राज्यातील १८ वर्षांवरील पात्र असणाऱ्या सर्वांना कोरोना लस पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे, असे ममता दीदींनी जाहीर केले. 

खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

लसींच्या किमतींवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र

ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसींच्या किमतींवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप कायम एक देश, एक पक्ष, एक नेता असे ओरडत असतो. पण लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते लसीची एक किंमत मात्र ठरवू शकत नाहीत. प्रत्येक भारतीयाला मोफत लस मिळायला हवी. यासाठी त्यांचे वय, जात, पंथ, स्थळ अशा कोणत्याही मर्यादा नकोत. खर्च केंद्र करो किंवा राज्य, पण भारत सरकारने देशभरात करोना प्रतिबंधक लसीची एकच किंमत ठरवून द्यायला हवी, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

सीरमकडून लसीची दरनिश्चिती 

भारत सरकारच्या आदेशानुसार आम्ही लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार, राज्य सरकारांना प्रत्येक लस ही ४०० रुपयांना दिली जाईल, तर खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येक लस ६०० रुपयांना विकली जाईल. जागतिक स्तरावरील लसींचा दर पाहता इतर लसींच्या तुलनेत स्वस्तात लस देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सीरमने अलीकडेच स्पष्ट केले आहे. दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारनेही राज्यातील पात्र असणाऱ्या सर्वांचे कोरोना लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: cm mamata banerjee declared that free vaccination will be provided to all above age of 18 years after May 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.