शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:08 IST

CM Devendra Fadnavis Delhi PC News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पीएम केअर फंडाचा वापर करावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

CM Devendra Fadnavis Delhi PC News: पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे २७ किंवा २८ सप्टेंबर या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या उर्वरित काही भागात अतिवृष्टी होऊ शकते. सरकारही अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी जी काही सतर्कता त्यादृष्टीने घेता येईल, त्यांच्या परिने ती त्यांनी घ्यायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

आत्ता राज्यभरातील प्रचंड पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आपण घेत आहोत. त्यामुळे यासंदर्भात आधीच काही बोलणे योग्य होणार नाही आणि ते फायद्याचेही नाही. पूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्याचे स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला देणार आहोत. हे स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही. त्यामुळे ते एकदा तयार झाले की, याची माहिती दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडाचा वापर करावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही

पीएम केअर फंडासारखा एक फंड तयार करण्यासाठी तेव्हा केंद्र सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परवानगी दिली होती. कोरोनात तो तयार झाला. ६०० कोटी रुपये त्या फंडात आले. एक नवा पैसा ते खर्च करू शकले नाहीत. आज अवस्था अशी झाली आहे की, सीएजीच्या नियमांप्रमाणे कोरोनासाठी तो फंड तयार झाला आहे, त्यामुळे तो इतरत्र खर्च करता येत नाही. या फंडाचे नेमके काय करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. लोकांनी ६०० कोटी रुपये या फंडाला दिले. या फंडात ६०० कोटी रुपये असताना, लोक तिथे पटापट मरत असताना, ते एक नवा पैसा खर्च करू शकले नाहीत. त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावे, हेदेखील ठरवले पाहिजे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

दरम्यान, सरकारने हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा. पावसाने तुमची शेती नाही तर आयुष्य वाहून गेले आहे. प्रत्येकवेळी यावेळी योग्य निर्णय घेऊ असे सांगता, तुमची ही योग्य वेळ कधी येणार आहे? का यासाठीही तुम्ही पंचांग पाहणार आहात? असा थेट सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. प्रधानमंत्री सहायता योजना म्हणजे पीएम केअर फंड नावाचा एका प्रकार नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत सुरू केला. जेव्हा नैसर्गिक, वैद्यकीय संकट, आपत्ती येईल, अशा वेळेला या फंडातून मोठ्या प्रमाणात मदत करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयात वापर करता येईल. त्या पीएम केअर फंडात मुंबईसारख्या शहरातून सव्वा दोन लाख कोटी रुपये जमा झाले. त्या पैशांचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis slams Thackeray over unspent COVID fund amid farmer crisis.

Web Summary : CM Fadnavis criticized Uddhav Thackeray for not using the ₹600 crore COVID fund while people suffered. He addressed the possibility of heavy rainfall and the demand for farmer debt relief, stating a review of the damage is underway before a statement is given to the central government.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी