शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee Death: आशीर्वादाचा तो स्पर्श कायम सोबत राहील! मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 23:10 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना शब्दांजली

देशसेवेसाठी फकीरी पत्करलेल्या या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी वाटणाऱ्या आकर्षणाचे रुपांतर नंतर श्रद्धेत झाले. अटलजींनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर ठेवलेल्या हातांचा तो स्पर्श मला कायम जाणवत राहायचा. मला तो आधारासारखा वाटायचा, कामाची ऊर्जा द्यायचा, निराश झालो की सांभाळूनही घ्यायचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील मनाने अटलजींना वाहिलेली ही शब्दांजली.....            

मी सुन्न आहे. बाहेरुन स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असलो तरी आतून कोसळून गेलो आहे. श्रद्धेय अटलजींच्या कितीतरी आठवणी दाटून येत आहेत. नागपुरात जनसंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. अटलजींसह देशातील सर्व मान्यवर नेते नागपुरात आले होते. अटलजींचे वडीलांशी स्रेहाचे संबंध होते. मी त्यांना भेटायला गेलो. आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. पण हिम्मत होत नव्हती. तसे मी वडिलांना सांगितलेही. पण काही कारणाने पहिल्या दिवशी ते साध्य झाले नाही. दुसऱ्या दिवशी मग मी प्रमोदजींकडे आग्रह धरला. प्रमोदजींनी अटलजींना विनंती केली आणि  त्यांनी होकार दिला. त्याचवेळी माझे वडील तेथे आले, तेव्हा अटलजी वडीलांना उद्देशून म्हणाले ‘दो शेरो के बिच मे मै खडा हू’ अटलजींच्या या कौतुकाने मी अक्षरश: भारावून गेलो होतो.वडील आजारी असताना ते दोन वेळा त्यांना भेटायला आले होते. प्रत्येक भेटीत त्यांची विनम्रता, साधेपणा मी आत्मसात करीत होतो. कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात अमाप जिव्हाळा असल्याचे जाणवत होते. त्या वयात फार कळत नव्हते. पण या अनुकरणीय वयात होणारे संस्कार नकळत माझ्यावर होत होते. देशसेवेसाठी फकीरी पत्करलेल्या या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी वाटणाऱ्या आकर्षणाचे रुपांतर नंतर श्रद्धेत झाले. अटलजींनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर ठेवलेल्या हातांचा तो स्पर्श मला कायम जाणवत राहायचा. मला तो आधारासारखा वाटायचा, कामाची ऊर्जा द्यायचा, निराश झालो की सांभाळूनही घ्यायचा. ऋषीतुल्य माणसाच्या अशा आशीर्वादाचे आपल्या आयुष्यात फार मोठे बळ असते. पण ती व्यक्ती निघून गेली की, आयुष्यात एक पोरकेपण येते. ते दु:ख कुणाला सांगता येत नाही. आयुष्यभर ती पोकळी कधी भरुनही निघत नाही. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूprime ministerपंतप्रधानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा