शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 14:55 IST

अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत. 

ठळक मुद्देराजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे.

जयपूर -राजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यपालांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता वृत्त आले आहे, की राज्यपाल कलराज मिश्र यांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी म्हटले आहे, की सध्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे आमदार कोरोना कोरोना व्हायरसने ग्रस्त आहेत. अशात विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही. अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत. 

अशा स्थितीत, तत्काळ विधानसभा अधिवेश बोलावण्याच्या आणि बहुमत सिद्ध करण्याच्या मुद्द्यावरून, अशोक गेहलोत सरकार सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्या राज्यपालांकडून विधानसभा अधिवेशनासंदर्भात अंतिम निर्णय येणे बाकी आहे.

अशोक गेहलोत आक्रमक -अशोक गेहलोत म्हणाले, "आम्ही राज्यपालांना म्हणालो आहोत, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावले नाही, तर आम्ही  सर्व आमदारांना घेऊन त्यांच्याकडे येऊ आणि अधिवेशन बोलावण्याची मागणी करू. मात्र, यावर राज्यपालांनी अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.

केंद्र सरकारकडून राज्यपालांवर दबाव टाकला जातोय - शुक्रवारी पत्राकर परिषदेत बोलताना अशोग गेहलोत म्हणाले, होते, की राज्यपालांवर केंद्र सरकारकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी कुणाच्याही दबावात यायला नको. एवढेच नाही, तर राज्यातील जनतेने संतप्त होऊन राजभवनाला घेराव घातला, तर आपली जबाबदारी नसेल, असेही गेहलोतांनी म्हटले होते.

...आणि सर्व गोष्टी जनतेच्या समोर येतील. मुख्यमंत्री गेहलोतांनी दावा केला आहे, की त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे अधिकवेशन बोलवावे. या अधिवेशनात राज्यातील संकटाबरोबरच या संकटावरही चर्चा होईल आणि सर्व गोष्टी जनतेच्या समोर येतील. 

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार