अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स, १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले; न्यायालयानेही समन्स बजावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 17:41 IST2024-02-14T17:40:34+5:302024-02-14T17:41:30+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने सहाव्यांदा समन्स पाठवले असून आता १९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स, १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले; न्यायालयानेही समन्स बजावले
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक समन्स पाठवले आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना सहावे समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आतापर्यंतचे हे सहावे समन्स आहे. ते एकदाही चौकशीसाठी ईडी ऑफिसला गेलेले नाहीत. याबाबत नुकतीच ईडीने न्यायालयात धाव घेतली होती.
भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना पाच समन्स पाठवण्यात आले आहेत, पण आतापर्यंत त्यांनी या समन्सला योग्य उत्तर दिलेले नाही. केजरीवाल अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ७ फेब्रुवारीला ईडीने या प्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी केली. तसेच अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
आता पुन्हा एकदा केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवीन आणि सहावे समन्स जारी केले आहे, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांना १९ फेब्रुवारी रोजी फेडरल एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.