शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत देशातील शहरांचे क्रमांक जाहीर;पुण्याने जोरदार मुसंडी मारत पटकावले 'हे' स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 13:42 IST

सलग चौथ्या वर्षी इंदोर शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवला आहे..

ठळक मुद्देपिंपरी चिंचवड शहराची सुधारणा, देशात 24 वा क्रमांक तर राज्यात पहिल्या दहामध्ये 

पुणे : स्वच्छ सर्वेक्षणात सन २०१९ मध्ये ३७ व्या स्थानावर राहिल्यामुळे पुणे महापालिकेने 'स्वच्छ सर्वेक्षण - २०२०' करिता जोरदार तयारी सुरू केली होती. पुणे शहराने यावर्षी देशात १५ तर महाराष्ट्र राज्यात ४ त्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. गतवर्षापर्यंत २ स्टार मानांकन असलेल्या पुण्याला यावर्षी ३ स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.  सलग चौथ्या वर्षी इंदोर शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे गुजरात आणि मुंबई आहे.     देशात सन २०१६ पासून सुरू झालेल्या 'स्वच्छ सर्वेक्षण' स्पर्धेत पहिल्या वर्षी ७३, २०१७ मध्ये ४३४,  सन २०१८ मध्ये ४,२०३  तर सन २०१९ मध्ये ४ हजार २३७ शहरांनी सहभाग नोंदविला होता.      

पुणे महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण करिता जोरदार तयारी सुरू केली होती. या स्पर्धेचा निकाल आज म्हणजे गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी ऑनलाइन जाहीर झाला. फाईव्ह स्टार मानांकनासाठी निवड झालेल्या सहा शहरांमध्ये पुण्याची वर्णी लागलेली नसली तरी, यावर्षी जोरदार मुसंडी मारत पुण्याने २ स्टार वरून ३ स्टार मानांकन मिळवत १५ वा क्रमांक मिळविला असल्याचे पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख न्यानेश्वर मोळक यांनी सांगितले आहे. 

.....................

स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराची सुधारणा, देशात 24 वा क्रमांक तर राज्यात पहिल्या दहामध्ये 

पिंपरी : मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यंदा सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 24 वा क्रमांक आला आहे. तर, राज्यात पिंपरी शहर पहिल्या दहामध्ये आले असून सातवा क्रमांक आला आहे. सर्वेक्षणाचा  गुरुवारी निकाल जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली. दरम्यान, मागीलवर्षी देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता.   

.........................    यावर्षी या स्पर्धेत पहिल्या २० मध्ये आलेल्या शहराची नावे पुढील प्रमाणे: १. इंदोर२. सुरत३. नवी मुंबई४. विजयवाडा५. अहमदाबाद६. राजकोट७. भोपाळ८. चंदिगड९. जीवीएमसी विशाखा पट्टम१०. वदोरा११. नाशिक१२. लखनौव१३. ग्वाल्हेर१४. ठाणे१५. पुणे१६. आग्रा१७. जबलपूर१८. नागपूर१९. गाझियाबाद२०. प्रयागराज--------       

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMumbaiमुंबई