प्रतिशोधाच्या भावनेनं केलेला न्याय म्हणजे न्याय नाही; हैदराबाद एन्काऊंटरवर CJIचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:42 PM2019-12-07T15:42:45+5:302019-12-07T15:57:12+5:30

हैदराबाद सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या करण्यात आलेल्या एन्काऊंटरवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मोठं विधान केलं आहे.

CJI's big statement on the Hyderabad encounter | प्रतिशोधाच्या भावनेनं केलेला न्याय म्हणजे न्याय नाही; हैदराबाद एन्काऊंटरवर CJIचं मोठं विधान

प्रतिशोधाच्या भावनेनं केलेला न्याय म्हणजे न्याय नाही; हैदराबाद एन्काऊंटरवर CJIचं मोठं विधान

Next

तेलंगणाः हैदराबाद सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या करण्यात आलेल्या एन्काऊंटरवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मोठं विधान केलं आहे. हैदराबाद एन्काऊंटरमधील ठार करण्यात आलेल्या घटनेवर त्यांनी टीका केली आहे. जोधपूरच्या एका कार्यक्रमात न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्याय कधीही प्रतिशोधाच्या भावनेनं करू नये, जर न्याय प्रतिशोधाच्या भावनेनं केल्यास त्याला अर्थ राहणार नाही. जोधपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात न्यायमूर्ती एस. ए बोबडे म्हणाले, कोणताही न्याय घाईघाईत करू नये, जर न्याय हा प्रतिशोधाच्या भावनेनं केला गेल्यास त्याचा गाभा नाहीसा होईल. यावेळी कायदामंत्री रविशंकर प्रसादही उपस्थित होते.

दरम्यान, हैदराबाद बलात्कार पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

 

पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली, तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्या वेळाने कॉल करते असं सांगून पीडितेने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं. 

Web Title: CJI's big statement on the Hyderabad encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.