Nirbhaya Case : निर्भया प्रकरणाच्या सुनावणीतून सरन्यायाधीश झाले बाजूला, पुनर्विचार याचिकेवर उद्या होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 16:27 IST2019-12-17T16:27:05+5:302019-12-17T16:27:59+5:30

Nirbhaya Case : या याचिकेवरील सुनावणी बुधवारी होणार आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीसाठी नवे घटनापीठ बुधवारी सकाळीच स्थापन केले जाईल.

CJI recuses himself from hearing the Nirbhaya rape case on personal grounds | Nirbhaya Case : निर्भया प्रकरणाच्या सुनावणीतून सरन्यायाधीश झाले बाजूला, पुनर्विचार याचिकेवर उद्या होणार सुनावणी

Nirbhaya Case : निर्भया प्रकरणाच्या सुनावणीतून सरन्यायाधीश झाले बाजूला, पुनर्विचार याचिकेवर उद्या होणार सुनावणी

नवी दिल्ली -  सात वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील  सुनावणी आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता या याचिकेवरील सुनावणी बुधवारी होणार आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीसाठी नवे घटनापीठ बुधवारी सकाळीच स्थापन केले जाईल. तसेच सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पुतण्याने निर्भयाच्या बाजूने युक्तिवाद केला असल्याने सरन्यायाधीश शरद बोबडे हे या सुनावणीपासून वेगळे झाले आहे.
 
निर्भया बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींपैकी चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. पैकी अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दयेची याचिका दाखल केली आहे. दरम्यान या सुनावणीवेळी निर्भयाचे पालकसुद्धा न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, दोषीच्या वकिलाला युक्तिवादासाठी  ३०  मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यावेळी दोषींच्या वकिलाने आपल्या अशिलाविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा करत सगळा दोष प्रसारमाध्यमांच्या माथी मारला. प्रसारमाध्यमांनीच आपल्या अशिलाविरोधात अपप्रचार केला. असा आरोप त्यांनी केला. 



दरम्यान, निर्भायाच्याआईने बलात्कार प्रकरणातील आरोपीने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेला विरोध दर्शवला होता. दोषीने फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब व्हावा म्हणून पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, असा आरोप निर्भयाच्या आईने आपल्या याचिकेमधून केला आहे. दोषींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी निर्भयाच्या आईने केली आहे. 

Read in English

Web Title: CJI recuses himself from hearing the Nirbhaya rape case on personal grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.