मेघराजाची शहरावर कृपा

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:12+5:302015-08-28T23:37:12+5:30

सोलापूर: वाहत्या वार्‍याबरोबर वाहत गेलेला पाऊस ऑगस्टच्या शेवटच्या चरणापर्यंत हुलकावणीच देत होता. शुक्रवारी सायंकाळी शहरासह मोहोळ, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट परिसरात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, आता पावसाला सुरूवात होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

The city of Meghraj is pleased | मेघराजाची शहरावर कृपा

मेघराजाची शहरावर कृपा

लापूर: वाहत्या वार्‍याबरोबर वाहत गेलेला पाऊस ऑगस्टच्या शेवटच्या चरणापर्यंत हुलकावणीच देत होता. शुक्रवारी सायंकाळी शहरासह मोहोळ, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट परिसरात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, आता पावसाला सुरूवात होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सोलापूर शहरात गुरूवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा होता. रात्री नऊच्या सुमारास मेघराजाने शहरावर कृपादृष्टी दर्शविली तर पंढरपूर, वडवळ, बार्शी तालुक्यातील काही भागात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. दक्षिण सोलापूरच्या कुंभारी, तोगराळी,होटगी याही परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे आता पावसाच्या इनिंगला सुरूवात होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

Web Title: The city of Meghraj is pleased