शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेमध्ये येणार; ईशान्येकडील राज्यात विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:08 IST

नक्की संमत होण्याचा भाजपला विश्वास

नवी दिल्ली : पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून छळामुळे आलेल्या बिगरमुस्लीम लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठीचे दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडण्यात येणार असून, ते तेथेही सहजपणे संमत होईल, अशी खात्री भाजपतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. हे विधेयक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लोकसभेत मंजूर झाले.

हे विधेयक सोमवारी मंजूर होताच, मंगळवारी ईशान्येकडील राज्यांमध्ये त्याविरोधात आंदोलने झाली. बाहेरील देशांतून येणाऱ्या या लोकांमुळे आमची संस्कृती नामशेष होईल, अशी भीती ईशान्येकडील लोकांना वाटत आहे. या सर्व राज्यांत आदिवासींची संख्या मोठी आहे.

लोकसभेत विधेयकाला पाठिंबा देणाºया शिवसेनेने भूमिका बदलली असून, राज्यसभेत हा पक्ष विरोध करेल, असे दिसते. नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)नेही लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा देताच, त्या पक्षात नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे तोही पक्ष विधेयकाला राज्यसभेत विरोध करेल, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास भाजप व जनता दल (संयुक्त) यांच्यात दुरावा निर्माण होऊ शकेल. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिल्याने काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली.

सध्या २३८ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत भाजप व मित्रपक्षांचे कितीही सदस्य असले तरी विधेयकाच्या बाजूने किमान १२३ मते पडतील आणि ते संमत होईल, असे भाजप नेते सांगत आहेत. भाजपचे राज्यसभेत ८३ सदस्य असून, अण्णा द्रमुक, जनता दल (संयुक्त), अकाली दल तसेच राष्ट्रपतीनियुक्त सदस्य मिळून ही संख्या १२४ हून अधिक होईल आणि ती १३0 पर्यंतही जाईल, असा भाजपचा दावाआहे.

काँग्रेस व मित्रपक्ष तसेच आप व वायएसआर काँग्रेस व काही अन्य मिळून ११२ सदस्य असल्याचे आता दिसत आहे. शिवसेना व जनता दल (संयुक्त)ने भूमिका बदलल्यास विधेयकाला विरोध करणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी शक्यता आहे.

...तर होईल अडचणशिवसेना व जनता दल (संयुक्त) यांचे राज्यसभेत प्रत्येकी तीन सदस्य आहेत. त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध केल्यास विधेयक संमत होण्यात अडचणी येऊ शकतील, अशी चर्चा आहे. भाजपचे नेते मात्र हे विधेयक सहज संमत होईल, असा दावा करीत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा