शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

Citizenship Amendment Bill: राज्यसभेत नागरिकत्व विधेयकावर शिक्कामोर्तब; आसाम, त्रिपुरामध्ये हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 06:18 IST

Cab Bill : गुवाहाटीमध्ये संचारबंदी लागू, १0 जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

नवी दिल्ली : आमच्या राज्यांमध्ये अन्य देशांतील शरणार्थींना स्थान देऊ न आमची संस्कृती व अस्तित्व संपवू नका आणि त्यांना आमच्या राज्यांत आणून देशाचे नागरिकत्व देण्यासाठीचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ताबडतोब मागे घ्या, या मागणीसाठी ईशान्येकडील राज्यांतसुरू झालेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. त्यामुळे आसामत्रिपुरामध्ये केंद्र सरकारने लष्कराच्या तुकड्या आणि निमलष्करी दलाच्या जवानांना पाठविले आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नागरिकत्व विधेयक रात्री राज्यसभेतही संमत झाले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर विरोधात १0५ मते पडली. शिवसेनेच्या सदस्यांनी मतदानाच्या वेळी सभात्याग केला. त्याआधी आसामच्या काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आली. आसाम व त्रिपुरातील आंदोलनाने बुधवारी उग्र स्वरूप धारण केले. काही ठिकाणी आंदोलकांची पोलिसांशी चकमकही झाली. तिथे निमलष्करी दलाचे पाच हजार जवान पाठविण्यात आले आहेत.

त्रिपुरामध्ये दोन व आसाममध्ये लष्कराची एक तुकडी तैनात केली आहे. आसामच्या लखीमपूर, धेमाजी, शिवसागर, जोरहाट, तीनसुकिया, दिब्रुगढ, चरायदेव, गोलाघाट, कामरूप, कामरूप या जिल्ह्यांत आंदोलनाचा भडका उडाला असून तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे.लष्कराला पाचारण केल्याने स्थानिक लोक अधिकच संतापले असल्याचे वृत्त आहे. निमलष्करी दलाच्या काश्मीरमधील २० व देशाच्या अन्य भागातील ३० कंपन्यांना तातडीने ईशान्य भारतामध्ये पाठविण्यात आले आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटरचा वापर भावना भडकाविण्यासाठी होण्याची शक्यता असल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

विद्यार्थी व पोलिसांमध्ये चकमक

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थी व युवक अग्रभागी आहेत. आसाममध्ये सचिवालयाजवळ आंदोलक विद्यार्थी व पोलीस यांच्यात चकमक उडाली. सचिवालयाच्या दिशेने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जमावाला ५०० मीटर अंतरावर रोखून धरण्यात आले. त्यावेळी आंदोलकांनी बॅरिकेड पाडताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीमारही केला. तेव्हा विद्यार्थ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पुन्हा पोलिसांवरच फेकल्या. दिब्रुगढमध्येही पोलीस व आंदोलकांमध्ये चकमक झाली.च्तेथील दगडफेकीत एक पत्रकार जखमी झाला. आंदोलनामुळे ईशान्य भारतात धावणाऱ्या १४ रेल्वेगाड्या रद्द तर काही रेल्वेगाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या.

मुख्यमंत्री सोनोवाल अडकले विमानतळावर

आंदोलनामुळे मुख्यमंत्री सर्वनंद सोनोवाल हेही काही काळ गुवाहाटी विमानतळावर अडकून पडले. तेजपूर येथून हेलिकॉप्टरने गुवाहाटीला आलेल्या सर्वनंद सोनोवाल यांच्या गाड्यांचा ताफा गुवाहाटीतील सर्व रस्ते आंदोलकांनी अडविल्यामुळे पुढे जाऊ शकत नव्हता. अखेर सुरक्षा दलांच्या मदतीने सोनोवाल ब्रह्मपुत्रा या शासकीय निवासस्थानी कसेबसे पोहोचले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिसArrestअटकdelhiदिल्लीBJPभाजपाAssamआसामTripuraत्रिपुरा