Citizenship Amendment Bill: आजचा दिवस ऐतिहासिक; आता कित्येक पीडितांना दिलासा मिळेल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 09:51 PM2019-12-11T21:51:21+5:302019-12-11T22:04:07+5:30

राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या खासदारांचे पंतप्रधान मोदींकडून आभार

Citizenship Amendment Bill This Bill Will Alleviate The Suffering Of Many Who Faced Persecution For Years says pm modi | Citizenship Amendment Bill: आजचा दिवस ऐतिहासिक; आता कित्येक पीडितांना दिलासा मिळेल- मोदी

Citizenship Amendment Bill: आजचा दिवस ऐतिहासिक; आता कित्येक पीडितांना दिलासा मिळेल- मोदी

Next

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. परवा लोकसभेत संमत झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर आज राज्यसभेत मतदान झालं. राज्यसभेत १२५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं, तर १०५ खासदारांनी विरोधात मतदान केलं. त्यामुळे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं. 'आपल्या देशाच्या बंधुभावाच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याचा आनंद आहे. या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या सर्व खासदारांचे मी आभार मानतो. यामुळे कित्येक वर्षांपासून अत्याचार सहन करणाऱ्या अनेकांना दिलासा मिळेल,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील आनंद व्यक्त केला. कोट्यवधी वंचित आणि पीडितांचं स्वप्नं आज प्रत्यक्षात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीडित आणि वंचितांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार, अशा शब्दांमध्ये शहांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. राज्यसभेत विधेयक मंजूर व्हावं यासाठी शहांनी विशेष प्रयत्न केले. विरोधकांनी उपस्थित केलेले सर्व दावे खोडून काढत त्यांनी सरकारची बाजू समर्थपणे मांडली. 

Web Title: Citizenship Amendment Bill This Bill Will Alleviate The Suffering Of Many Who Faced Persecution For Years says pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.