CAA : भाजपकडून मुस्लिमांचा बदला घेण्याचा प्रयत्न; मायावतींची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:41 IST2019-12-17T15:41:20+5:302019-12-17T15:41:29+5:30
CAA : आमचा पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेतही नागरिकत्व कायद्याविरोधात आवाज उठवणार असल्याचे मायावती म्हणाल्या.

CAA : भाजपकडून मुस्लिमांचा बदला घेण्याचा प्रयत्न; मायावतींची भाजपवर टीका
नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. तर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्यांनतर आता याच मुद्द्यावरून राजकीय पडसाद सुद्धा उमटत असून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. तर बसपा प्रमुख मायावती यांनी सुद्धा नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. देशातील मुस्लिमांचा भाजप बदला घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपकडून नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात याला विरोध होत आहे. तर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिवर्सिटीतर मोठा राडा पाहायला मिळाला. त्यांनतर अनेक ठिकाणी हिंसक घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर बऱ्याच ठिकाणी जाळपोळच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत.
तर त्यानंतर आता याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनशील असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. तसेच आमचा पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेतही नागरिकत्व कायद्याविरोधात आवाज उठवणार असल्याचे मायावती म्हणाल्या. तसेच भाजप हे देशातील मुस्लिमांचा बदला घेत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, नागरिकत्व कायदा मानवतेच्या विरोधात आहे. कायद्याच्या अडून कोणत्याही समाजाला लक्ष करू नयेत. तसेच जामियाच्या विद्यार्थ्यांविरोधात पोलिस बळ वापरण्यात येत असल्याने सर्वच स्तरावरून याचे विरोध होत असल्याचे मायावती म्हणाल्या. तर काँग्रेसप्रमाणे भाजपने सुद्धा आणीबाणीची परिस्थिती निर्माण करू नयेत असा टोला सुद्धा त्यांनी भाजपला लगावला.