शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

काँग्रेस पाकिस्तानप्रमाणे देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय, CAB वरून मोदींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 17:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत प्रथमच जाहीरपणे भाष्य केले आहे.

दुमका - केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सध्या देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांकडून या विधेयकाला विरोध होत असतानाच देशातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत प्रथमच जाहीरपणे भाष्य केले आहे. मोदींनी या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि सहकारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कालपर्यंत देशाला बदनाम करण्याचे जे काम पाकिस्तान करायचा ते आता काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असा आरोप मोदींनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुमका येथे प्रचारसभा घेतली. त्यावेळी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेस आणि त्यांचे सहकारी वाद निर्माण करत आङेत. त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसल्याने जाळपोळ करत आहेत. मात्र ही जाळपोळ करणारे कोण आहेत, हे त्यांनी घातलेल्या कपड्यांवरून समजून येत आहे, असा टोला मोदींनी लगावला. 

 नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसने परदेशात केलेल्या आंदोलनांवरही मोदींनी टीका केली. कलम 370 , राम जन्मभूमीबाबत पाकिस्तानने लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन केले होते. आता काँग्रेस पाकिस्तानचीच री ओढत आहे, असा आरोप मोदींनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसेन दिल्लीमध्ये भारत बचाओ रॅलीचे आयोजन केले होते. तत्पूर्वी एक दिवस आधी  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जगभरातील भारतीय दूतावासांबाहेर आंदोलन केले होते. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस