शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीला केजरीवालांनी सरकारी शाळेच्या शिक्षकांना बोलावल्यानं वाद, भाजपाचं टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 11:01 IST

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

ठळक मुद्देआम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. दिल्ली सरकारी शाळेच्या शिक्षक आणि मुख्याधापक, अधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यास सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथ विधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. शिक्षण संचालनालय एक सर्क्युलर जारी केलं आहे, ज्यात दिल्ली सरकारी शाळेच्या शिक्षक आणि मुख्याधापक, अधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यास सांगण्यात आलं आहे. सर्क्युलर जारी झाल्यानंतर विरोधकांनी केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम आदमी पार्टीनं स्वतःच्या शिक्षा मॉडलचा खूप प्रचार केला होता, त्यांचा दावा आहे की, राजधानीतील सरकारी शाळांचा त्यांनी कायापालट करून दाखवला आहे. सर्क्युलरनुसार, शपथविधीला सर्वच शाळेच्या मुख्याध्यापकांबरोबर 20 नियमित आणि अतिथी शिक्षकांनाही पाठवून द्या. शिक्षण संचालनालयनं शपथविधीच्या निमंत्रणानंतर सांगितलं की, सर्वच मुख्याध्यापक 20 शिक्षकांसह उपस्थित राहण्याची सूचना संचालनालयाच्या ऑफिसला 15 फेब्रुवारीपर्यंत पाठवून द्या. त्यानंतर त्याची एक कॉपी प्रवेश दारावर हजेरी तपासणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला पाठवून द्यावी. सर्वांनाच आयडी कार्ड घेऊन येण्यास सांगितलं आहे. 16 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता शपथ विधी कार्यक्रमाला पोहोचावं लागणार आहे. सर्क्युलर प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसनं केजरीवालांवर हल्लाबोल केला आहे. आम आदमी पार्टीनं मोफत योजनांच्या घोषणांवर निवडणूक जिंकली आहे. त्यांच्याकडे आमदार भरपूर आहेत, परंतु जनतेचा पाठिंबा नाही. शपथ विधी सोहळ्यात लोक येणार नसल्याची त्यांना भीती आहे, म्हणूनच त्यांनी 30,000 शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी टीका भाजपाचे दिल्लीतील प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी केली आहे. काँग्रेसनंही आम आदमी पार्टीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारी शाळेच्या शिक्षकांना केजरीवालांच्या शपथविधीला येण्यास सांगितलं आहे. शपथविधी सोहळ्यात गर्दी जमवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, असं काँग्रेसचे प्रवक्ते मुकेश शर्मा ट्विट करत म्हणाले आहेत. तर सरकार अधिकाऱ्यांच्या मते, सरकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षा मॉडलवर दिलेल्या आमच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आम्हाला बोलावलं आहे. परंतु उपस्थित अनिवार्य आहे की ऐच्छिक हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल