शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

हिंदीची सक्ती करणारे परिपत्रक दक्षिण रेल्वेकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 7:04 AM

प्रादेशिक भाषांना मनाई : तामिळनाडूत द्रमुकच्या निदर्शनानंतर रेल्वे खात्याने उचलले पाऊल

चेन्नई : कार्यालयीन कामकाजासाठी प्रादेशिक भाषांऐवजी फक्त इंग्लिश व हिंदीचा वापर करावा, असे दक्षिण रेल्वेचे परित्रक अखेर तामिळनाडूच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले. रेल्वेस्थानकातील कर्मचारी व रेल्वे वाहतूक नियंत्रकांवर या परिपत्रकाद्वारे हिंदी व इंग्रजीची सक्ती करण्यात आली होती. द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी त्याविरोधात शुक्रवारी जोरदार निदर्शन केली. बुधवारी जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात म्हटले होते की, कामकाजामध्ये कोणत्याही त्रुटी व विसंवाद राहू नये म्हणून हिंदी व इंग्लिश भाषेचा वापरकरावा.

रेल्वे वाहतूक नियंत्रक व मुख्य कार्यालयामधील संवादामध्ये सुधारणा व्हावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. दक्षिण भारतामध्ये हिंदी भाषेला प्रचंड विरोध आहे. या परिपत्रकामुळे संतप्त झालेल्या द्रमुक कार्यकर्त्यांनी दक्षिण रेल्वे मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. खासदार दयानिधी मारन यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने दक्षिण रेल्वेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन निषेध केला. त्यानंतर दक्षिण रेल्वेने हे परिपत्रक रद्द केल्याचे जाहीर केले आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलीन म्हणाले होते की, तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचाच नव्हे, तर या भाषेचे वर्चस्व निर्माण व्हावे हा दक्षिण रेल्वेचा हेतू आहे. त्यासाठी उद्धट भाषेत परिपत्रक काढण्यात आले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे अधिकाऱ्यांना धमकाविले जात आहे. हा प्रयत्न हाणून पाडला जाईल. तामिळनाडूवर हिंदीची सक्ती करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने आता बंद करावेत. तसे न झाल्यास द्रमुक हिंदीवर कायमची बंदी घालेल. (वृत्तसंस्था)शाळांतही विरोधच्केंद्र सरकारने अलीकडेच शाळांमध्ये तीन भाषा प्रणालीचा प्रस्ताव मांडल्यापासून तामिळनाडूमध्ये हिंदीला असलेला विरोध पुन्हा उफाळून आला आहे.च्या प्रस्तावात शालेय भाषा, मातृभाषा व तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली होती.च्त्याला तामिळनाडूत प्रचंड विरोध झाल्यानंतर हिंदी भाषेची सक्ती करण्याचा कोणताही विचार नाही, अशी सारवासारव केंद्राने केली होती.च्बीएसएनएल, टपाल कार्यालये, रेल्वेस्थानकांच्या कार्यालयांवरील हिंदी फलकांवरही काळे फासण्यात आले होते.

टॅग्स :railwayरेल्वेhindiहिंदी