‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 06:58 IST2025-05-22T06:57:20+5:302025-05-22T06:58:19+5:30

या अहवालानुसार, कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर अवैधरीत्या इंटरनेटद्वारे बाजारात येतो...

Cinema suffers a loss of Rs 22400 crore due to 'piracy'; Who is affected | ‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?

‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?


मुंबई : हिंदीसह स्थानिक भाषांतील सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्याच्या पायरेटेड कॉपीज बाजारात येण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून २०२३ या एका वर्षात ‘पायरसी’मुळे चित्रपट उद्योगाचे २२ हजार ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चित्रपट उद्योगाच्या अर्थकारणावर आधारलेल्या ईवाय-आयएएएआय अँटी पायरसी स्टडीज  या अभ्यास अहवालात हे वास्तव समोर आले आहे. बॉलिवूड उद्योगाचे अर्थकारण नाजूक अवस्थेत असताना ‘पायरसी’मुळे त्याला अधिकच फटका बसत असल्याचेही त्यात म्हटले आहे.

या अहवालानुसार, कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर अवैधरीत्या इंटरनेटद्वारे बाजारात येतो. त्यामुळे प्रामुख्याने चित्रपट निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात काम करणारे कर्मचारी ‘पायरसी’च्या प्रकरणांत गुंतलेले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अहवालानुसार २०२३ मध्ये चित्रपटांचे १३ हजार ७०० कोटी रुपयांचे, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे ८७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

धक्कादायक म्हणजे, देशातील ५१ टक्के लोक चित्रपटगृह अथवा ‘ओटीटी’चे अधिकृत सबस्क्रिप्शन न घेता पायरेटेड  कॉपीजमधून सिनेमा अथवा मालिका बघत असल्याचे समोर आले आहे. आजच्या घडीला सोशल मीडिया, विविध मोबाइल ॲप आदी माध्यमातून सर्वाधिक पायरसी होत असून, प्रामुख्याने १९ ते ३४ या वयोगटातील लोक सर्वाधिक पायरेटेड कंटेट बघत असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

‘पायरसी’चा फटका कुणाला?
ज्या सिनेमांचे अथवा मालिकांचे बजेट फारसे नाही, अशा निर्मात्यांना या पायरसीचा सर्वाधिक फटका बसतो आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची प्रत बाहेर जाऊ नये म्हणून निर्मात्यांना अधिक सतर्क राहावे लागत आहे. 


कुठे किती अवैध प्रेक्षक? 
आकडे कोटीत
९.३० भारत 
४.७५ इंडोनेशिया 
३.११ फिलिपाइन्स  
१.८२ थायलंड 
१.६० व्हिएतनाम 

कुठे किती होते पायरसी?
६३% अवैध वेबसाइट 
१६% मोबाइल ॲप्स
१०% सोशल मीडिया
११% अन्य माध्यमे 

कोणत्या भाषांना सर्वाधिक फटका?
    हिंदी     ४० टक्के
    इंग्रजी     ३१ टक्के
    दाक्षिणात्य     २३ टक्के
    अन्य     ६ टक्के

Web Title: Cinema suffers a loss of Rs 22400 crore due to 'piracy'; Who is affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा