शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिश्चन, पारशी समाजाचाही CAA मध्ये समावेश, मग मुस्लिमांनाच का वगळलं? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 15:10 IST

या कायद्यांतर्गत हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख यांच्याशिवाय ख्रिश्चन आणि पारशी निर्वासितांनाही नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मग मुस्लिम समाजालाच का वगळलं? या प्रश्नाला उत्तर देताना शाह म्हणाले...

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर माहिती दिली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कायद्यातील तरतुदींसंदर्भातही सविस्तर भाष्य केले आहे. या कायद्यांतर्गत हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख यांच्याशिवाय ख्रिश्चन आणि पारशी निर्वासितांनाही नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मग मुस्लिम समाजालाच का वगळलं? या प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी फाळणीचा संपूर्ण इतिहासच सांगितला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शाह म्हणाले, 'या देशाचा एक इतिहास आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी देशाची फाळणी झाली. आपल्या भारताचे तीन तुकडे झाले. आमची विचारधारा याच्या विरोधात होती. धर्माच्या आधारावर देशाची फाळणीच व्हायला नको होती.'

शाह म्हणाले, "देशाची फाळणी झाली. यानंतर तेथे अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असतील, त्यांच्या माता, बहिणी, मुलींवर अत्याचार होत असतील, तर आपले काय कर्तव्य आहे? त्या लोकांना आश्रय देणे हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात दंगली झाल्या. हिंदूंव मोठे अत्याचार झाले. तेव्हा, तुम्ही लोक जेथे आहात तेथेच थांबा, आम्ही तुमची व्यवस्था करू, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. 70 वर्षांत ते आश्वासन विसरवले गेले, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ते पूर्ण करत आहेत."

"पाकिस्तान आणि बांगलादेशातून हिंदू-शिख कुठे गेले?"एवढेच नाही, तर हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्म हे मूळचे भारतीय धर्म आहेत. यामुळे या धर्मांच्या पीडित नागरिकांना भारतात आणणे समजू शकते. मात्र, ख्रिश्चन आणि पारशी तर परदेशातील धर्म आहेत. मग त्यांना का आणले जात आहे? असा प्रश्न विचारला असता, अमित शहा म्हणाले, 'तो भाग मुस्लिमांसाठी बनवण्यात आला होता. मात्र, जे लोक अखंड भारताचा भाग होते आणि ज्यांचा धार्मिक छळ झाला आहे, त्यांना आश्रय देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे."

"...तेव्हा पाकिस्तानात 23 टक्के हिंदू होते. आज 3 टक्के शिल्लक आहेत" - शाह पुढे म्हणाले, "जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानात 23 टक्के हिंदू होते. आज केवळ 3 टक्के शिल्लक आहेत. कुठे गेले हे लोक? या लोकांना त्रास दिलागेला यामुळे त्यांनी मोठ्या संख्येने धर्म परिवर्तन केले. बांगलादेशसंदर्भात बोलायचे झाल्यास, 1951 मध्ये तेथे हिंदूंची संख्या 22 टक्के होती आणि 2011 मध्ये हा आकडा 10 टक्क्यांवर आला. अफगाणिस्तानात 1992 मध्ये 2 लाख शिख आणि हिंदू होते. आज केवळ 500 च उरलेले आहेत. या लोकांना आपल्या आस्थेने जगण्याचा अधिकार नाही. जेव्हा भारत एक होता तेव्हा हे सर्व आपलेच बंधू होते." 

याच वेळी भारतात मुस्लीम समाजासाठीही नागरिकत्वासंदर्भात स्वतंत्र तरतूद आहे. हा कायदा तर केवळ अशा लोकांसाठीच आहे, जे पीडित होऊन आले आहेत, असेही अमित शाह यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशAfghanistanअफगाणिस्तान