शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारताला मोठं यश; लडाखमध्ये चिनी सैन्याची अडीच किलोमीटरपर्यंत माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:45 IST

पूर्व लडाखच्या गलवानमधून भारतीय सैन्याचे काही जवान माघारी परतले

लडाख: गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं होतं. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र दोनच दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे. चिनी सैन्यानं त्यांची वाहनंदेखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानंदेखील आपले काही जवान मागे घेतले आहेत. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. मात्र आता लडाखमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे सरकलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं याबद्दलची माहिती दिली आहे. चिनी सैन्यानं माघार घेतल्यानंतर काही भारतीय जवानदेखील मागे सरकले. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिग पॉईंट १५ आणि हॉट स्प्रिंग परिसरातून अडीच किलोमीटर मागे गेल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्यानंतर भारतानंही काही जवानांना माघारी बोलावलं. सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये संवादाच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्यावर एकमत झालं. मात्र यानंतर सोमवारी चीननं कोणतीही सकारात्मक पावलं टाकली नाहीत. उलट युद्धाभ्यास सुरू करत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पूर्व लडाखमधील गलवान भागातून चिनी सैन्य मागे हटलं आहे.गलवानमध्येच भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर आता दोन्ही देशांनी या भागातील सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्रीपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीननं सैन्य हटवल्यानं भारतानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जवानांना परतण्याचे आदेश दिले.

टॅग्स :chinaचीनladakhलडाखIndian Armyभारतीय जवान