शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

“लडाखमध्ये भारतीय हद्दीत चीनने कब्जा केला का? केंद्र सरकार गप्प का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 3:08 PM

लडाखमध्ये चीनी सैन्यांनी भारतीय हद्दीत कब्जा केला का? हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे असं खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

हैदराबाद – भारत आणि चीन यांच्यात गेल्या महिनाभरापासून लडाख सीमेवर तणाव सुरु आहे. अलीकडेच चीन आणि भारतीय सैन्यामध्ये चर्चा झाली. मात्र त्यात काही तोडगा निघाला नाही. यावरुन आता एआयएमआयचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारशी चीनसोबत काय चर्चा झाली? सरकार गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, सीमा विवादात भारत आणि चीनी सैन्य यांच्यात चर्चा झाली. चीनींसोबत काय चर्चा झाली हे केंद्र सरकारने देशाला सांगावे. त्यांनी लाजिरवाणं वाटत आहे का? ते गप्प का? लडाखमध्ये चीनी सैन्यांनी भारतीय हद्दीत कब्जा केला का? हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे असं ते म्हणाले.

पूर्व लडाखमध्ये जवळपास महिन्याभरापासून सीमेवर चीनच्या कारवाया संपत नाही, भारत आणि चीन सैन्य अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी एक बैठक झाली, त्यातही काही निष्पन्न झालं नाही. दोन्ही सैन्यांनी काही दिवसांपूर्वी सैन्य मागे घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली.  पण दोन्ही देशांनी सध्याच्या परिस्थितीत समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुटनीती आणि सैन्यस्तरावर हालचाली सुरु ठेवल्या आहेत.

 

चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने चायनीज आर्मी (पीएलए) च्या टाक्यांसह युद्ध अभ्यास करत असल्याचा व्हिडीओ जारी केला. ग्लोबल टाईम्सने सांगितले की, पीएलएचे चिनी सैनिक त्यांच्या सामान्य वाहनाची चाचणी घेत आहेत. पीएलएच्या या व्हिडिओमध्ये, चिनी सैनिक आपल्या टँकसह डोंगराळ भागात सराव करत आहेत. यापूर्वी सोमवारी लडाख सीमेवर सुरु असलेल्या तणावानंतर शनिवारी झालेल्या चर्चेनंतर चीनने दुटप्पी भूमिका घेतल्याचं दिसून आलं.

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरुन सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान चीनेने भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक तैनात केले आहे. चीनने हजारो सैनिकांसह अनेक टँक, बख्तबंद गाडी यांना लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)जवळ तैनात केले आहे. लष्करी व डिप्‍लोमेटिक लेवलवर चीनशी चर्चा यापुढे देखील सुरूच राहील असं परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. मात्र लडाखमधील सीमेवर दोन्ही देशांतील मोठ्या संख्येने सैन्य जमले आहे. त्यांना परत बोलावण्याबाबत काही निर्णय झाला की नाही हे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं नाही. परंतु सीमावादवरुन भारत आणि चीनधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतchinaचीन