चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 19:27 IST2025-10-24T19:26:55+5:302025-10-24T19:27:15+5:30
China Building Air Defence Complex: पाच वर्षांपूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीमुळे भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारत आणि चीन यांच्यामधील संबंध म्हणावे तसे सुधरलेले नाहीत. याचदरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या कुरापती सुरूच असून, उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमधून आता चीनचं नवं कटकारस्थान उघडकीस आलं आहे.

चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
पाच वर्षांपूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीमुळे भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारत आणि चीन यांच्यामधील संबंध म्हणावे तसे सुधरलेले नाहीत. याचदरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या कुरापती सुरूच असून, उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमधून आता चीनचं नवं कटकारस्थान उघडकीस आलं आहे. पँगाँग सरोवराजवळील नियंत्रण रेषेजवळ चीन एक नवा एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स उभं करत आहे. हे ठिकाण २०२० साली गलवान येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणापासून ११० किमी अंतरावर आहे.
चीनकडून सुरू असलेलं हे बांधकाम त्याच्या अत्याधुनिक, झाकलेल्या मिसाईल लॉन्चिंग पोझिशन्स आणि मोठ्या पायाभूत रचनेमुळे लक्ष वेधून घेत आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते या भक्कम शेल्टर्समध्ये चीनच्या लाँग रेंज एचक्यू-९ सरफेस टू एअर मिसाईल्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यावरून या भागातील एअर डिफेन्सच्या क्षमतेमध्ये हे कॉम्प्लेक्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. या कॉम्प्लेक्सचं बांधकाम पँगाँग लेकच्या साईटवर सुरू आहे.
या डिझाइनची ओळख सर्वप्रथम ऑलसोर्स अॅनॅलिसिसने पटवली होती. त्याची रेप्लिका गार कौंटीमध्ये आहे. ती प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून सुमारे ६५ किमी दूर अंतरावर आहे. तसेच भारताच्या अॅडव्हान्स न्योमा हवाई तळाच्या अगदी समोर आहे. इतर स्पेस इंटेलिजन्स एजन्सी Vantor च्या स्वतंत्र संकेतस्थळावरील फोटोंमध्ये संशयास्पद मिसाईल लॉन्च साईट्सवर स्लायडिंगचं छप्पर दिसत आहे. त्यामधील प्रत्येक छप्पर एवढं मोठं आहे की, त्यामध्ये दोन वाहनं आरामात समावू शकतात. Vantor इमेजरीच्या २९ सप्टेंबरच्या फोटोंमध्ये काही लॉन्च पोझिशन्सवर खुलं छप्पर दिसत आहे. त्यामधून खाली काही लॉन्चर्स असू शकतात. असा अंदाज वर्तवला जात आहे. ही बाब ऑपरेशनल क्षमतेच्या अॅडव्हान्स स्टेजकडे इशारा करत आहे.
तर अमेरिकेच्या जियो इंटेलिजेन्स फर्म ऑलसोर्स अॅनॅलिसिसच्या रिपोर्टनुसार झाललेल्या मिसाईल लॉन्च साईट्समध्ये हॅचलेस छप्पर असतात. त्यामुळे हॅच उघडल्यावर लाँचिंग हॅचच्या माध्यमातून फाचर करताना लपून आणि सुरक्षित राहता येतं. त्यामुळे लपण्यासाठी जागा आणि ऑपरेशनल रेडिनेस दोन्हीही मिळतं.