शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

लडाख सीमेवरील चीनची सैन्य जमवाजमव चिंताजनक, लष्करप्रमुख जनरल नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 7:15 AM

India-China News: पूर्व लडाख भागात चीनने सैन्यात केलेली वाढ तसेच मोठ्या सैन्य तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शनिवारी केले.

नवी दिल्ली : पूर्व लडाख भागात चीनने सैन्यात केलेली वाढ तसेच मोठ्या सैन्य तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शनिवारी केले. चिनी लष्कराच्या (पीएलए) कारवायांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. नरवणे यांनी म्हटले की, चीनकडून सलग दुसऱ्या हिवाळ्यात येथील लष्करी जमवाजमव कायम ठेवली गेली; तर येथील स्थिती एलओसीसारखी (पाकसोबतची नियंत्रण रेषा) होईल. चिनी लष्कर सीमेवर कायम राहिले, तर भारतीय लष्करही तैनात राहील. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर मागील १७ महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात तणावपूर्ण स्थिती आहे. द्विपक्षीय चर्चेनंतर काही चौक्यांहून दोन्ही देशांनी माघार घेतली असली, तरी अनेक ठिकाणी अजूनही सैन्याच्या तुकड्या तैनात आहेत. 

अफगाणी अतिरेकी काश्मिरात घुसण्याचा धोका -लष्करप्रमुख- अफगाणिस्तानातील स्थिती स्थिर झाल्यानंतर तेथील अतिरेकी जम्मू-काश्मिरात घुसू शकतात, अशी भीती लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी व्यक्त केली आहे.-  नरवणे यांनी सांगितले की, दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती, तेव्हा अफगाणी अतिरेक्यांनी जम्मू-काश्मिरात घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते. मात्र, आपली घुसखोरी विरोधी व्यवस्था मजबूत आहे तसेच आपली संरक्षण दले कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास समर्थआहेत.-  काश्मिरात वाढलेल्या नागरिकांच्या हत्या आणि अफगाणमधील तालिबान राजवट यांच्यात काही संबंध आहे का, असा प्रश्न जनरल नरवणे यांना विचारण्यात आला होता. - त्यावर त्यांनी म्हटले की, याबाबत काही सांगणे अवघड आहे. मात्र, याआधीच्या तालिबानी राजवटीचे वेळी घुसखोरी वाढली होती. आताही ती वाढण्याचा धोका आहे.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख