शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 2:39 PM

या व्हिडिओनंतर असे मानले जात आहे, की चीनने एक प्रकारे भारत आणि अमेरिकेला उघड-उघड धमकीच दिली आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे 150 तर चीनकडे 320 आण्वस्त्र आहेत.

ठळक मुद्देया व्हिडिओनंतर चीनने भारत आणि अमेरिकेला उघड-उघड धमकीच दिल्याचे मानले जात आहे.चीन आपल्याकडील अण्वस्त्रांचे सार्वजनिकरित्या प्रदर्शन करत आहे - सिप्रीभारताकडे 150 तर चीनकडे 320 आण्वस्त्र आहेत.

पेइचिंग :भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर, चीन पुरता बिथरला आहे. आता चीनने भारताला थेट हायड्रोजन बॉम्बची भीती दाखवायला सुरुवात केली आहे. जगात शांततेचे ढोंग करणाऱ्या चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्‍लोबल टाइम्‍सने 1967मध्ये हायड्रोजन बॉम्बच्या परीक्षणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याच बरोबर, हा हायड्रोजन बॉम्ब स्वसंरक्षणासाठी असून आपला देश अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही, या सिद्धांतावर कायम असल्याचे म्हटले आहे.

India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद

ग्‍लोबल टाइम्‍सने लिहिले आहे, 'आजच्याच दिवशी 1967मध्ये चीनने आपल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. चीन निष्‍ठापूर्वक स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्र धोरण राबवित आहे आणि अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या सिद्धांतावर कायम आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने हायड्रोजन बॉम्बच्या परीक्षणाचा हा व्हिडिओ, भारत आणि अमेरिकेसोबत त्याचा तणावर शिगेला पोहोचलेला असतानाच पोस्ट केला आहे. 

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स', यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

अण्वस्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शन करतोय चीन -या व्हिडिओनंतर असे मानले जात आहे, की चीनने एक प्रकारे भारत आणि अमेरिकेला उघड-उघड धमकीच दिली आहे. अण्वस्त्रांवर लक्ष ठेवणारी आंतरराष्‍ट्रीय संस्‍था सिप्रीने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की चीन आपल्याकडील अण्वस्त्रांचे सार्वजनिकरित्या प्रदर्शन करत आहे. चीन आपल्याकडील अण्वस्त्रे अत्यंत वेगाने आधुनिक करण्याबरोबरच वाढवतही आहे. 

चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!

चीनकडे 320 अणू बॉम्बजागतीक महासत्ता बणण्याचे स्वप्न पाहत असलेला चीन आता झपाट्याने आण्विक क्षस्त्रांचा साठा वाढवू लागला आहे. चीनने आता पहिल्यांदाच जमीन, हवा आणि समुद्रातून मारा करता येतील, असे आण्वस्त्र तयार करायला सुरुवात केली आहे. आण्वस्त्रांवर नजर ठेवणारी आंतरराष्‍ट्रीय संस्‍था सिप्रीने म्हटले आहे, की भारत आणि चीन या दोघांनीही गेल्या वर्षी आपल्याकडील आण्वस्त्रांमध्ये वाढ केली आहे. मात्र, भारताकडील आण्वस्त्रे चीनच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहेत. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे 150 तर चीनकडे 320 आण्वस्त्र आहेत.  गेल्या वर्षात चीनने 30 आण्वस्त्र तयार केली आहेत. तर भारताने 10 आण्वस्त्र तयार केली आहेत. तर पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक आण्वस्त्र आहेत. त्यांच्याकडे एकूण 160 आण्वस्त्र आहेत.

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndiaभारतladakhलडाखAmericaअमेरिका