शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिनी रोबोटला स्वदेशी सांगणं भोवलं; AI समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीला बाहेरचा रस्ता, अखेर स्टॉल गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:55 IST

चिनी रोबोटवरुन सुरु झालेल्या वादानंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीला समिटमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Robotic Dog Controversy At AI Summit: राजधानी दिल्लीत सुरू असलेल्याएआय समिटमध्ये एका रोबोटिक श्वानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गलगोटिया युनिव्हर्सिटीने एका चिनी कंपनीच्या रोबोटला स्वतःचा शोध म्हणून सादर केल्याचा आरोप झाल्यानंतर, सरकारने युनिव्हर्सिटीला एक्सपो एरिया रिकामी करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. यावरून आता देशात राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमका वाद काय?सोशल मीडियावर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नेहा सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात त्या एका रोबोटिक डॉगला ओरियन असे संबोधून, तो युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसने तयार केल्याचा दावा करताना दिसल्या. मात्र, टेक तज्ज्ञांनी तातडीने हा दावा खोडून काढला. हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या यूनिट्री कंपनीचा Go2 मॉडेल असून तो बाजारात २ ते ३ लाख रुपयांना सहज उपलब्ध आहे.

सरकारची कारवाई आणि युनिव्हर्सिटीचा बचाव

या दिशाभूल करणाऱ्या दाव्यामुळे गलगोटिया युनिव्हर्सिटीला समिटमधून बाहेर करण्यात आले आहे. मात्र, युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर डॉ. ऐश्वर्या यांनी हे वृत्त नाकारले आहे. आम्हाला अद्याप स्टॉल हटवण्याचे कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. आम्ही कधीही असा दावा केला नव्हता की हे तंत्रज्ञान आम्ही बनवले आहे. आमची युनिव्हर्सिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ३५० कोटींची गुंतवणूक करत आहे आणि संशोधनासाठी आम्ही ही उपकरणे आणली आहेत. व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला गेला," असे डॉ. ऐश्वर्या यांनी म्हटलं. दुसरीकडे, प्रोफेसर नेहा सिंह यांनीही कबुली दिली. "कदाचित बोलताना गोष्टी स्पष्टपणे मांडल्या गेल्या नाहीत. उत्साहाच्या भरात माझ्याकडून ते विधान झाले असावे, त्याची जबाबदारी मी घेते," असं नेहा सिंह म्हणाल्या.

राजकीय वातावरण तापले;

या प्रकरणावरून आता राजकारणही तापले आहे. काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "चीनच्या रोबोट्सना भारताचे उत्पादन म्हणून दाखवून मोदी सरकारने जागतिक स्तरावर देशाची थट्टा केली आहे. चिनी प्रसारमाध्यमेही आता भारतावर हसत आहेत," अशी टीका काँग्रेसने केली. दुसरीकडे "ही समिट केवळ एक पीआर तमाशा बनली आहे. भारताच्या टॅलेंटचा वापर करण्याऐवजी चीनच्या उत्पादनांचे प्रदर्शन केले जात आहे," असे राहुल गांधींनी म्हटले.

एक्सकडून युनिव्हर्सिटीच्या दाव्याचे 'फॅक्ट-चेक'

युनिव्हर्सिटीने "आम्ही कधीही असा दावा केला नव्हता" असे स्पष्टीकरण दिल्यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने त्यावर कम्युनिटी नोट जोडली आहे. यात स्पष्ट म्हटले आहे की, युनिव्हर्सिटीचा हा नवा दावा दिशाभूल करणारा आहे, कारण सुरुवातीला त्यांनी तो रोबोट स्वतःचा शोध असल्याचेच सांगितले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : University ousted from AI summit for falsely claiming Chinese robot.

Web Summary : Galgotia University faced backlash at an AI summit for presenting a Chinese robot dog as its own creation. The university was asked to leave after the misrepresentation sparked controversy and political criticism. The university denies the claims.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सIndiaभारतdelhiदिल्ली