चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:49 IST2025-11-04T12:41:12+5:302025-11-04T12:49:14+5:30
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या मैत्रीने आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर आल्याचा खळबळजनक दावा भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी केला आहे.

चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या मैत्रीने आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर आल्याचा खळबळजनक दावा भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी केला आहे. 'ऑल वेदर' मैत्री म्हणून ओळखले जाणारे हे संबंध आता एका 'ऑल-वेदर अलायन्स'च्या दिशेने जात असून, याचा एकमेव उद्देश भारताच्या प्रगतीला आणि वाढत्या ताकदीला रोखणे आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
सोमवारी पुणे इंटरनॅशनल सेंटर आयोजित एका महत्त्वपूर्ण संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. चीनमध्ये भारताचे माजी राजदूत गौतम बंबावाले यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.
तीन आघाड्यांवर चीनला पाकची मदत
हर्षवर्धन श्रृंगला यांनी चीन-पाकिस्तान संबंधावर अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या मते, चीन केवळ बचावात्मक साहित्य पुरवण्यापलीकडे जाऊन आता तिन्ही मोर्च्यांवर पाकिस्तानला मदत करत आहे.
श्रृंगला म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान चीन आणि पाकिस्तानमधील ही 'डीप स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप' स्पष्टपणे दिसली. चीनची ही मदत केवळ संरक्षण पुरवठ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती गुप्तचर माहिती आणि मुत्सद्देगिरीतील समर्थनापर्यंत पोहोचली आहे. यातूनच भारताला रोखण्यासाठी एक ऑल-वेदर अलायन्स तयार झाली आहे."
माजी परराष्ट्र सचिवांनी या वाढत्या युतीबद्दल धोक्याचा इशारा देत, भारताने क्षमता बांधणी, नवनिर्मिती आणि देशाच्या धोरणात्मक हितांवर आधारित भागीदारीद्वारे याला उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.
भारताची विदेश नीती 'आदर्शवाद आणि वास्तववाद' यांचा संगम
जागतिक स्तरावर वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत भारताची विदेश नीती कशी असावी याबद्दलही श्रृंगला यांनी महत्त्वपूर्ण मते मांडली. जी२० अध्यक्षपदासाठी भारताचे मुख्य समन्वयक म्हणून काम केलेल्या श्रृंगला यांनी सांगितले की, "भारताची देश नीती ही वास्तववाद आणि आदर्शवाद यांच्यातील समतोल दर्शवते. कासाशी संबंधित गरजा, धोरणात्मक स्वायत्तता णि एका सर्वसमावेशक जागतिक दृष्टिकोनावर ही नीती आधारलेली आहे."
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या माहितीनुसार, माजी परराष्ट्र सचिवांनी भारताची आंतरराष्ट्रीय स्थिती मजबूत करण्यासाठी धोरणात्मक निवारण, कुशल मुत्सद्देगिरी आणि देशांतर्गत विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांवर बोलताना श्रृंगला यांनी एक वेगळा दृष्टिकोन मांडला. त्यांनी पाकिस्तानचा दृष्टिकोन अल्प-मुदतीचा सामरिक असतो, तर भारताची मुत्सद्देगिरी दीर्घकाळ टिकणारी आणि संस्थात्मक सते, अशी तुलना केली. देशिक आणि जागतिक संतुलनावर बोलताना, त्यांनी भारताच्या ‘पडोसी पहले’ या धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, ग्लोबल साउथ, पश्चिम आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया या क्षेत्रांसोबत अधिक सखोल संबंध जोडण्यावर त्यांनी जोर दिला.