शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एक इंच जमिनीवरही चीन अतिक्रमण करू शकत नाही; अरुणाचलमध्ये गृहमंत्री अमित शाह कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 04:29 IST

‘भारताच्या भूमीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होता, तो काळ आता संपला आहे.

किबिथू (अरुणाचल प्रदेश) :

‘भारताच्या भूमीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होता, तो काळ आता संपला आहे. आता कोणीही देशाच्या सीमेकडे पाहण्याची हिंमत करत नाही. लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) शौर्याने भारताच्या एका इंच जमिनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही,’ असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी कुरापतखोर चीनवर केला.

अरुणाचल प्रदेशातील किबिथू या गावात ‘व्हायब्रंट व्हिलेज’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना शाह यांनी पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांकडे लक्ष वेधले. शाह म्हणाले की, आमच्या जमिनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होता, तो काळ गेला आहे. आता सुईच्या टोकाएवढी जमीनही अतिक्रमण करता येणार नाही.१९६२च्या युद्धाची आठवण- १९६२च्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या किबिथूच्या शहिदांना श्रद्धांजली वाहताना शाह म्हणाले की, त्यांनी संसाधनांची कमतरता असतानाही अदम्य धैर्याने लढा दिला. येथे लोक ‘जय हिंद’ने एकमेकांना अभिवादन करतात, जे देशभक्तीच्या भावनेने आपले हृदय भरते. - पूर्वी सीमाभागातून परतणारे लोक भारतातील शेवटच्या टोकाच्या गावात गेल्याचे सांगत असत, परंतु मोदी सरकारने ते बदलले आहे. आता लोक म्हणतात की त्यांनी भारतातील पहिल्या गावात प्रवास केला आहे.

चीनला पोटदुखी, म्हणे शाह यांचा दौरा सार्वभौमत्वाचे उल्लंघनचीनने सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर टीका करत या भागावरील चीनच्या सार्वभौमत्वाचे त्यांनी उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. अरुणाचलमधील भूभागांवर आपला दावा बळकट करण्याच्या उद्देशाने चीनने भारताच्या सीमावर्ती राज्यातील काही ठिकाणांची नावे बदलण्याची कुरापत केली होती. चीनच्या या निर्णयाचा निषेध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनने शाह यांच्या दौऱ्याला विरोध केला. 

गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या तीव्र प्रतिक्रियेवर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी, अरुणाचल प्रदेशच्या आपल्या नेत्यांच्या भेटींवर चीनचे असे आक्षेप भारत नेहमीच फेटाळत आला आहे. शाह यांच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, ‘झांगनान (अरुणाचल प्रदेशचे चिनी नाव) चीनचा भूभागाचा भाग आहे. झांगनानमधील भारतीय नेत्याची कृती चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन करते आणि सीमावर्ती भागात शांतता आणि शांतता राखण्यात बाधा आणते. आम्ही याच्या विरोधात ठाम आहोत.’

टॅग्स :Amit Shahअमित शाह