अरुणाचलनंतर आता उत्तराखंडवर चीनचा डोळा! LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 18:07 IST2023-05-26T18:03:26+5:302023-05-26T18:07:23+5:30
ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जातील, ज्यावर चिनी आर्मी म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी लक्ष ठेवणार आहे.

अरुणाचलनंतर आता उत्तराखंडवर चीनचा डोळा! LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना
चीन नेहमी भारताविरोधात काहीतरी कुरापती करताना दिसून येतो. अनेक दशकांपासून चीन केवळ अरुणाचल प्रदेशकडेच नाही तर आता उत्तराखंडकडेही लक्ष देत आहे. चीन उत्तराखंड सीमेला लागून असलेल्या भागात गावे वसवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जातील, ज्यावर चिनी आर्मी म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी लक्ष ठेवणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक गावात 250 घरे असतील. मोठी गोष्ट म्हणजे ही सीमावर्ती गावे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) केवळ 11 किलोमीटर अंतरावर बांधली जात आहेत. याशिवाय, चीन एलएसीपासून 35 किमी अंतरावर 55-56 घरे असलेली गावेही वसवली जात आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीही त्यांच्यावर देखरेख करेल. ही सर्व गावे चीनच्या सीमेला लागून असलेल्या पूर्वेकडील सेक्टरमधील 400 गावे वसवण्याच्या योजनेचा भाग आहेत.
दरम्यान, उत्तराखंड या पहाडी राज्याची चीनशी 350 किलोमीटरची सीमा आहे. मात्र, बहुतांश सीमावर्ती भागात उपजीविकेची तीव्र कमतरता असून, त्यामुळे येथे स्थलांतर होत आहे. याआधी बातम्या आल्या होत्या की, चीन उत्तराखंडमधील नीती पासजवळ नवीन कॅम्प उभारत आहे. दुसरीकडे, चीनच्या या नव्या चालीबाबत भारतीय लष्कर अधिकच सावध झाले आहे. भारतीय लष्कर आधीच एलएसीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.