शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एकच नंबर! झाडं लावण्यात भारत, चीन अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:06 IST

नासानं दिलेल्या अहवालातील आकडेवारी समोर

वॉशिंग्टन: लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या चीन आणि भारतामध्ये विकास वेगानं सुरू असल्यानं त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो, अशी जगाची धारणा आहे. मात्र या समजुतीला छेद देणारा एक अहवाल समोर आला आहे. वृक्षारोपणात भारत आणि चीन आघाडीवर असल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे हा अहवाल प्रतिष्ठीत अशा नासा या संस्थेनं दिला आहे. नासानं उपग्रहांच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये असलेल्या वृक्षांची संख्या विचारात घेतली. त्यात भारत आणि चीन झाडं लावण्यात अव्वल असल्याचं दिसून आलं. जगातील एकूण झाडांचा विचार केल्यास, त्यातील एक-तृतीयांश वृक्षवल्ली चीन आणि भारतात असल्याचं अहवालाचं लेखन करणाऱ्या ची. चेन यांनी सांगितलं. मात्र पृथ्वीवरील जंगलांचा विचार केल्यास आकडेवारी नेमकी उलट आहे. जगातील एकूण वनक्षेत्राचा विचार केल्यास, त्यातील केवळ 9 टक्के क्षेत्र भारत आणि चीनमध्ये असल्याचं चेन सांगतात. भारत आणि चीनमध्ये वेगानं शहरीकरण सुरू आहे. त्यामुळे झाडांवर कुऱ्हाड पडते आहे. मात्र तरीही हेच दोन देश वृक्ष लावण्यात अग्रेसर असल्याचं दिसून येतं. ही बाब आश्चर्यजनक असल्याचं बोस्टन विद्यापीठाच्या चेन यांनी म्हटलं.नेचर सस्टेनेबिलिटी मासिकात सोमवारी एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये नासाच्या अहवालाची माहिती आहे. नासाच्या उपग्रहांनी गेल्या काही वर्षातील (2000 ते 2017) वृक्ष लागवडीचा वेग आणि प्रमाण टिपलं. त्याचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात भारत आणि चीन वृक्ष लावण्यात आघाडीवर असल्याचं दिसून आलं. चीनमधील 42 टक्के क्षेत्र वन जमिनीखाली आहे. तर 32 टक्के भागात शेती केली जाते. त्यामुळे चीन हिरवागार आहे. मात्र भारताच्या बाबतीत हीच बाब नेमकी उलट आहे. भारतात तब्बल 82 टक्के जमिनीवर शेती केली जाते. मात्र भारतातील वनक्षेत्राचं प्रमाण केवळ 4.4 टक्के इतकंच आहे. वायू, जल, जमिनीवरील प्रदूषण रोखण्यासाठी चीननं महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या अंतर्गत चीननं प्रदूषण कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम चीनमध्ये पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :NASAनासाIndiaभारतchinaचीनenvironmentवातावरणpollutionप्रदूषण