खेळता-खेळता कुकरमध्ये अडकलं मुलाचं डोकं; अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर असं काढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 23:35 IST2021-08-28T23:28:08+5:302021-08-28T23:35:03+5:30
ही घटना लोहमांडी येथे घडली. येथे कोसीकलान येथील रहिवासी सुमायला आपल्या माहेररी आली होती. तिच्यासोबत तिचा दीड वर्षाचा मुलगा हसनही होता. घरात खेळत असताना मुलाने कुकर त्याच्या डोक्यावर ठेवले. यामुळे त्याचे डोके कुकरमध्ये अडकले...

खेळता-खेळता कुकरमध्ये अडकलं मुलाचं डोकं; अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर असं काढलं
लखनौ - यूपीतील आग्रा येथे खेळत असताना एका चिमुकल्याचे डोके प्रेशर कुकरमध्ये अडकले. तोंड कुकरमध्ये गेल्याने या चिमुकल्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. यामुळे तो जोर जोरात रडू लागला. हे पाहून कुटुंबातील लोकही घाबरले. त्यांनी मुलाला त्या स्थितीतच जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे हा सर्व प्रकार पाहून डॉक्टर त्याला घेऊन तत्काळ ऑपरेशन थेएटरमध्ये गेले. मात्र, त्यांनाही कुकरमधून या मुलाचे डोके बाहेर काढता आले नाही. अखेर, जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर, ग्लायंडर मशीनच्या सहाय्याने कुकर कापून, या चिमुकल्याचे डोके बाहेर काढण्यात आले.
ही घटना लोहमांडी येथे घडली. येथे कोसीकलान येथील रहिवासी सुमायला आपल्या माहेररी आली होती. तिच्यासोबत तिचा दीड वर्षाचा मुलगा हसनही होता. घरात खेळत असताना मुलाने कुकर त्याच्या डोक्यावर ठेवले. यामुळे त्याचे डोके कुकरमध्ये अडकले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावर मुल जोर जोरात रडू लागले. कुटुंबप्रमुख भोला खान यांनी मुलाला जवळच्या एसएम चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये नेले.
शेत विकून पतीनं पत्नीच्या नावावर जमा केले 39 लाख, खात्यात 11 रुपये सोडून महिला शेजाऱ्यासोबत फरार
रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी या चिमुकल्याला ऑपरेशन थेटरमध्ये नेले. मात्र, त्यांना या चिमुकल्याचे डोके कुकरमधून बाहेर काढता आले नाही. अखेरीस डॉक्टरांनी कटरसह मेकॅनिकला बोलावले. इलेक्ट्रॉनिक कटरने प्रेशर कुकर कापले गेले. चिमुकल्याला इजा होऊ नये, म्हणून हे काम अत्यंत काळजीपूर्वक केले गेले. शेवटी दोन तासांनंतर मुलाचे डोके कुकूरबाहेर निघले. अर्धा तास मुलाला ऑक्सिजनवरदेखील ठेवण्यात आले होते. यानंतर तो सामान्य झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.