शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाचा मोबदला म्हणून मुलाची पिळवणूक मुलाच्या माता-पित्यास डांबले : दोन सावकारांचे कृत्य

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

सोलापूर :

सोलापूर :
वीटभ˜ीवर काम करणार्‍या एका दाम्पत्याने कर्जाने घेतलेले पैसे व्याजासह देऊन टाकले. असे असतानाही रक्कम येणेबाकी असल्याचे धमकावत व्याजाच्या रकमेत त्याच्या मुलास जबरदस्तीने कामावर ठेवून त्याची पिळवणूक करणार्‍या दोन सावकारांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलास घेऊन जाण्यासाठी आलेल्या त्याच्या माता-पित्यास डांबून ठेवत मारहाणही केली.
यल्लप्पा विठ्ठल जाधव आणि दशरथ गायकवाड अशी सावकारी व्यवसाय करणार्‍यांची नावे आहेत. डोणगाव रोडवर यल्लप्पा जाधव याची वीटभ˜ी आहे. त्यावर मच्छिंद्र विठ्ठल कसबे आणि त्याची पत्नी हे दोघे कामास आहेत. मच्छिंद्रने यल्लप्पाकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते. कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करूनही यल्लप्पा आणि त्याचा साथीदार दशरथ हे दोघे पैशासाठी मच्छिंद्रकडे तगादा लावले होते. व्याज येणे आहे असे सांगून दोघा सावकारांनी मच्छिंद्र याचा मुलगा शंकर याला कामाला ठेवले. व्याजाच्या रकमेत त्याची पिळवणूक करुन घेत होते. दरम्यान, मुलास घेऊन जाण्यासाठी कसबे पती-पत्नी वीटभ˜ीवर आले असता दोघा आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मच्छिंद्र कसबे याच्या फिर्यादीनुसार तपास फौजदार पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)