मुलांना भूकवाढीची औषधे देणे टाळावे बालवाडीत भाजी-फळे महोत्सव: तज्ज्ञांचे आवाहन

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:19+5:302015-03-06T23:07:19+5:30

अहमदनगर : मुलांना भूकवाढीची औषधे देऊ नयेत, रक्ताची वाढ झाली तरच भूक वाढते. मुलांच्या चरबी वाढीसाठी साजुक तूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉ. नितीन सायंबर यांनी सांगितले.

Children should not avoid appetite medicines at the time of 'Bhaji-Fruit Festival' in kindergarten. | मुलांना भूकवाढीची औषधे देणे टाळावे बालवाडीत भाजी-फळे महोत्सव: तज्ज्ञांचे आवाहन

मुलांना भूकवाढीची औषधे देणे टाळावे बालवाडीत भाजी-फळे महोत्सव: तज्ज्ञांचे आवाहन

मदनगर : मुलांना भूकवाढीची औषधे देऊ नयेत, रक्ताची वाढ झाली तरच भूक वाढते. मुलांच्या चरबी वाढीसाठी साजुक तूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉ. नितीन सायंबर यांनी सांगितले.
पाईपलाईन रोडवरील अक्षरनंदन बालवाडीत शनिवारी फळे आणि भाजीपाला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात मुलांनी भाज्या आणि फळांची वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना डॉ. नितीन सायंबर, मनिषा जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सायंबर म्हणाले, बाळाची वाढ ही आई गरोदर असताना शेवटच्या चार महिन्यांपासून सुरू होते. बाळाच्या बुद्धीच्या वाढीसाठी लोह, आयोडिन, बायोटीन, व्हीटॅमीन, कॅल्शिअम, प्रथिने, आयर्न यांची आवश्यकता असते. त्यासाठी मुलांना सकाळच्या कोवळ्या उन्हात एक तास बसवावे. मुलांना भूक लागत नाही याचे कारण रक्ताची कमतरता, अशक्तपणा हेच असते. मुलांच्या वाढीसाठी पुरणपोळी अधिक प्रमाणात खाण्यास द्यावी. यावेळी मुलांनी भाज्या व फळांवरील गीते सादर केली. यावेळी मुलांनी विविध फळे आणि भाज्यांची आरोग्याशी सांगड घालून घोषवाक्ये तयार केली.
---------
फोटो- ०६ आनंद

Web Title: Children should not avoid appetite medicines at the time of 'Bhaji-Fruit Festival' in kindergarten.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.