'पोराबाळांची बँकेत खाती उघडली, भाजपने देशाला फसवले; इंडियाची सभा लालू प्रसाद यादवांनी गाजवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 18:28 IST2023-09-01T18:28:00+5:302023-09-01T18:28:53+5:30
आज विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत बोलताना लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर टीका केली.

'पोराबाळांची बँकेत खाती उघडली, भाजपने देशाला फसवले; इंडियाची सभा लालू प्रसाद यादवांनी गाजवली
देशात काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्वपक्षीयांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली असून आज इंडियाची बैठक मुंबईत झाली. यावेळी विरोधी पक्षांनी मोदी सरकावर टीका केली. बिहारचे नेते माजी मंत्री
लालू यादव यांनी पंतपधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
महायुतीच्या सभेत अजित पवार कडाडले; संजय राऊत-जितेंद्र आव्हाडांना जोरदार फटकारले
लालू प्रसाद यादव म्हणाले, जर देशात विरोधी पक्ष एकवटला नाही आणि एकही उमेदवार उभा राहिला नाही तर त्याचा फटका देशाला सहन करावा लागेल. याचाच फायदा आतापर्यंत मोदींना झाला. देशातील महागाईवरुनही केंद्रावर टीका केली. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे, टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. देशात गरिबी वाढत आहे. यांच्या राज्यात टोमॅटोला चव राहिलीच नाही. या देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. भाजपच्या १५ लाखाच्या त्याच जुन्या घोषणेवर टीका केली.
लालू प्रसाद यादव म्हणाले, 'हे लोक म्हणजे भाजप खोटे बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले आहेत. माझे आणि इतर अनेकांचे नाव घेत त्यांनी त्यांचे पैसे स्विस बँकेत असल्याचे सांगितले होते. आम्ही हे पैसे आणून प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करू, असे मोदींनी सांगितले होते.''भाजपच्या या आश्वासनाने आमचीही फसवणूक झाली आहे. आणि आम्ही आमचे खाते देखील उघडले, असा टोलाही लालू प्रसाद यादव यांनी लगावला.
लालू प्रसाद यादव यांनी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचाही उल्लेख केला. त्याचबरोबर आपल्यावर अनेक ऑपरेशन्स झाल्या आहेत, आपली किडनी ट्रान्सप्लांट झाली आहे आणि आपली हिंमत अजून बुलंद आहे आणि मोदी आणि भाजपला हटवूनच आपण थांबणार असल्याचे यादव म्हणाले.