आईला वापरलेले मास्क उचलताना पाहिलं अन् लेकरांनी 'स्मार्ट डस्टबिन' बनवलं; स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ठरलं वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:30 PM2021-07-20T16:30:18+5:302021-07-20T16:31:01+5:30

आपल्या आईला लोकांनी वापरुन टाकून दिलेले मास्क उचलावे लागत आहेत आणि यातून कोरोनाचा धोका उद्भवू शकतो या काळजीनं मुलांना राहवत नव्हतं. मग काय आईवरच्या मायेपोटी जगातील कोणताही व्यक्ती कोणतीही आणि कितीही अशक्य गोष्ट असली की ती साध्य करू शकतो हे या लेकरांनी सिद्ध करून दाखवलं.

Children Made Smart Dustbin For Disposal Of Mask To Save Their Mother From Corona Infection | आईला वापरलेले मास्क उचलताना पाहिलं अन् लेकरांनी 'स्मार्ट डस्टबिन' बनवलं; स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ठरलं वरदान

आईला वापरलेले मास्क उचलताना पाहिलं अन् लेकरांनी 'स्मार्ट डस्टबिन' बनवलं; स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ठरलं वरदान

Next

उत्तर प्रदेशाच्या वाराणसीत एक महिला स्वच्छता कर्मचारी कचरा वेचत असताना तिला लोकांनी वापरून टाकून दिलेले मास्क देखील उचलावे लागत आहेत हे तिच्या मुलांनी पाहिलं आणि त्यांना काळजात धस्सं झालं. आपल्या आईला लोकांनी वापरुन टाकून दिलेले मास्क उचलावे लागत आहेत आणि यातून कोरोनाचा धोका उद्भवू शकतो या काळजीनं मुलांना राहवत नव्हतं. मग काय आईवरच्या मायेपोटी जगातील कोणताही व्यक्ती कोणतीही आणि कितीही अशक्य गोष्ट असली की ती साध्य करू शकतो हे या लेकरांनी सिद्ध करून दाखवलं. अवघ्या १२ वर्षांच्या आयुष आणि रेशमा यांनी स्मार्ट डस्टबिन तयार केला. यात लोकांना वापरलेले मास्क टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं. (Children Made Smart Dustbin For Disposal Of Mask To Save Their Mother From Corona Infection)

कोरोना विषाणूची लागण होण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हेच दोन महत्वाचे उपाय आहेत. पण यासोबतच वापरलेल्या मास्कच्या विल्हेवाटाची नवी समस्या देखील उभी राहिली आहे. निष्काळजीपणातून वापरलेला मास्क आपण कुठेही टाकून दिला तर त्यातूनही मोठा धोका उद्भवू शकतो. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

पालिकेच्या सफाई कर्मचारी विभागात काम करणाऱ्या आपल्या आईला आयुष आणि रेशमा यांनी लोकांनी वापरलेले मास्क उचलताना पाहिलं. त्यानंतर दोघांनीही वापरलेले मास्क टाकून देण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे दोघांनी तयार केलेला डस्टबिन हा साधासुधा नसून यात मास्कची योग्यरित्या विल्हेवाट देखील लावली जाते. 

आयुष आणि रेशमानं तयार केलेल्या स्मार्ट डस्टबिनमध्ये मास्क टाकला की त्यात एक हिटर कार्यान्वित होतो. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात मास्क जळून खाक होतो आणि त्याची राख उरते. 

कसं काम करतो स्मार्ट डस्टबिन?
आयुष आणि रेशा यांनी अवघ्या ३५०० रुपयांत हा डस्टबिन तयार केला आहे. याची उंची ३ फूट इतकी असून तो पूर्णपणे लोखंडी आहे. यात एक हिटर बसविण्यात आला आहे. वापरलेला मास्क यात टाकला की यातील हिटर कार्यान्वित होतो. त्यानंतर मास्कच्या विघटनाची प्रक्रिया सुरू होते. 

विशेष म्हणजे, यात एक सेंसर देखील बसविण्यात आला आहे. या डस्टबिनजवळ एखादा व्यक्ती आला की तो आपोआप कार्यान्वित होतो. त्याचं झाकण आपोआप उघडतं आणि त्यात तुम्ही मास्क टाकला की हिटर देखील काम करायला सुरुवात करतो. काही सेकंदातच मास्क जळण्यास सुरुवात होते. यात दोन पर्याय देखील देण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार ऑटो किंवा मॅन्युअल मोडवर त्याचा वापर करू शकता. 

Web Title: Children Made Smart Dustbin For Disposal Of Mask To Save Their Mother From Corona Infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.