"ती माझ्याशी बोलतच नाही"; 2 दिवस आईच्या मृतदेहासह राहिला लेक; 'असं' समोर आलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 11:16 IST2023-03-04T11:10:57+5:302023-03-04T11:16:01+5:30
आईच्या मृत्यूनंतरही मुलगा स्वतः शाळेत गेला आणि संध्याकाळी मित्रांसोबत बागेत खेळायला गेला. त्यांच्यासोबत जेवणही केले होते. खेळून तो घरी परतायचा आणि पुन्हा आईच्या शेजारी झोपायचा.

"ती माझ्याशी बोलतच नाही"; 2 दिवस आईच्या मृतदेहासह राहिला लेक; 'असं' समोर आलं सत्य
बंगळुरूमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एक 11 वर्षाचा मुलगा दोन दिवस आपल्या आईसोबत ती आराम करत आहे असं समजून झोपला होता. धक्कादायक बाब म्हणजे आईचा मृत्यू झाला होता. मुलाची आई आजारी होती आणि यामुळे तिचा मृत्यू झाला, परंतु मुलाला याची माहिती नव्हती. सकाळी उठल्यावर आई झोपली आहे असं वाटलं. यानंतर मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ झोपून राहिला.
अन्नम्मा असं मृत महिलेचं नाव असून त्या 44 वर्षांच्या होत्या. तिला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता असे सांगण्यात आले आहे. यामुळे तिचा मृत्यू झाला. सुमारे दोन दिवस महिलेचा 11 वर्षांचा मुलगा आईसोबत झोपला होता, मात्र आई न उठल्याने तिने शेजारी राहणाऱ्या मित्राला याची माहिती दिली. त्याची आई दोन दिवसांपासून झोपेतून उठली नाही आणि बोलत नाही, असे त्याने त्याच्या मित्राला सांगितले. यानंतर मित्राचे पालक त्याच्या घरी पोहोचले आणि महिलेचा मृत्यू झाल्याचे दिसले.
आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा संशय
अन्नम्मा मूकबधीर होत्या आणि त्यांच्या पतीचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाल्याचे एका अहवालात सांगण्यात आले. पतीच्या निधनानंतर त्या बंगळुरूच्या आरटी नगरमध्ये मुलासोबत राहत होत्या. तिचा मुलगा शाळेत जायचा आणि ती घरकाम करायची. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी दोन दिवस काम केलं नाही. आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुलगा शाळेतून आल्यावर खेळायचा
आईच्या मृत्यूनंतरही मुलगा स्वतः शाळेत गेला आणि संध्याकाळी मित्रांसोबत बागेत खेळायला गेला. त्यांच्यासोबत जेवणही केले होते. खेळून तो घरी परतायचा आणि पुन्हा आईच्या शेजारी झोपायचा. त्यांच्या घरातूनही दुर्गंधी येत असल्याचे काही शेजाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. मुलगा आता काकाकडे राहतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"