शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

'सरन्यायाधीशांच्या बदनामीची मलाही ऑफर', सुप्रीम कोर्टातील वकिलाचा फेसबुकवरुन गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 13:47 IST

सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्यावर झालेले लैंगिक आरोपाचं खंडन करत न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

नवी दिल्ली - देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचल जात असून देशातील न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचं ते म्हणाले. गोगई यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत एका महिलेने 22 न्यायाधीशांना पत्र लिहिले होते. त्यानंतर, गोगई यांनी विनम्रपणे आपल्या भावना बोलून दाखवल्या. आता, सर्वोच्च न्यायालयातील वकिल उत्सव बैंस यांनी सरन्यायाधीशांना लैंगिक शोषण प्रकरणात बदनाम करण्याची मलाही ऑफर देण्यात आली होती, असे म्हणत याप्रकरणात उडी घेतली आहे.

सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्यावर झालेले लैंगिक आरोपाचं खंडन करत न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. पुढील आठवड्यापर्यंत सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जाणूनबुजून माझ्यावर असले आरोप लावण्याचा प्रयत्न होत असल्याचंही गोगोई यांनी सांगितलं. त्यानंतर, आता सर्वोच्च न्यायालयातील वकिल उत्सव बैंस यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरु माहिती दिली आहे. त्यामध्ये, सरन्यायाधीशांची बदनामी करण्याची ऑफर मला देण्यात आली होती. त्यासाठी, मला संबंधितांनी मोठी लाचही ऑफर केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगई यांना सरन्यायाधीशपदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशा प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा डाव होता. सदर बाब सांगण्यासाठी मी सरन्यायाधीशांच्या घरी गेलो होतो. मात्र, ते घरी नसल्यामुळे त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही, असेही बैंस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.  

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात एका महिलेने सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायाधीशांना पत्र लिहून आपले लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मुख्य न्यायाधीश म्हणून 20 वर्ष मी केलेल्या सेवेचं हे बक्षिस आहे का? 20 वर्षानंतर आजही माझ्या खात्यात फक्त 6 लाख 80 हजार रुपये आहेत. एवढचं काय तर माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्याहून अधिक पैसे आहेत. माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करु शकत नाही म्हणून या प्रकारचा आरोप लावला जात आहे. न्यायव्यवस्थेला कोणीही बळीचा बकरा बनवू शकत नाही असंही गोगोई यांनी सांगितले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे महासचिव संजीव सुधाकर कलगावकर यांनी सांगितले की, महिलेकडून लावण्यात आलेले आरोप दुर्दैवी आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं. तर न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेवर लोकांचा असणारा विश्वास पाहता न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला घेऊन चिंता व्यक्त केली. अशाप्रकारच्या आरोपांमुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल असंही सांगितले.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRanjan Gogoiरंजन गोगोईFacebookफेसबुकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक