Hathras case: "सर्व नमुन्यांची होतेय पोलखोल, हाथरसमध्ये कुठल्याही प्रकारचे कारस्थान यशस्वी होणार नाही"

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 7, 2020 04:46 PM2020-10-07T16:46:01+5:302020-10-07T16:53:51+5:30

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही. (yogi adityanath)

UP chief minister yogi adityanath attacks on opposition over hathras case | Hathras case: "सर्व नमुन्यांची होतेय पोलखोल, हाथरसमध्ये कुठल्याही प्रकारचे कारस्थान यशस्वी होणार नाही"

Hathras case: "सर्व नमुन्यांची होतेय पोलखोल, हाथरसमध्ये कुठल्याही प्रकारचे कारस्थान यशस्वी होणार नाही"

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशात दंगल घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग'एक्सप्रेस वे ते एअरपोर्टपर्यंत होतोय यूपीचा विकास'समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, म्हणून कट-कारस्थान

लखनौ - हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक हाथरस प्रकरणावरून राजकारण करत आहेत. कट-कारस्थान केले जात आहेत. कट-कारस्थानासाठी परदेशातून फंडिंग करण्यात आली. मात्र, हे कट-कारस्थान कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही.

विरोधक राज्यात दंगलीची स्वप्न बघतायत, आंतरराष्ट्रीय फंडिंगने कट-कारस्थान; योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात दंगल घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग -
हाथरस प्रकरणासंदर्भात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवून आणण्यासाठी फंडिंग करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर ही फंडिंग मॉरिशसमधून झाली असल्याचे ईडीने म्हटले आहे. यावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, जनतेच्या विश्वासाशी खेळ खेळण्याची मुभा कुणालाही दिली जाणार नाही. 

'एक्सप्रेस वे ते एअरपोर्टपर्यंत होतोय यूपीचा विकास' -
योगी आदित्यनाथ म्हणाले, समाजात द्वेष भावना निर्माण करून विकासात अडचणी निर्माण करण्याची काही लोकांची इच्छा आहे. विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश वेगाने पुढे जात आहे. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात केवळ दोनच एक्सप्रेस वे होते. आमचे सरकार आल्यापासून तीन वर्षात तीन नवे एक्सप्रेस वे तयार होत आहेत. 2014पर्यंत उत्तर प्रदेशात केवळ दोनच विमानतळं कार्यरत होती. आता 7 विमानतळं कार्यरत आहेत. तर 12 नव्या एयरपोर्टवरील काम सुरू झाले आहे.

Hathras Gangrape: आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, यूपी पोलीस अन् सरकारवरही विश्वास नाही; पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, म्हणून कट-कारस्थान -
योगी म्हणाले, या लोकांना हितकारक, समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत. विकासाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत, म्हणून आता, अशा प्रकारचे कट-कारस्थान आखत आहेत. मात्र, आता या नमुन्यांची पोलखोल होत आहे. यांचे कारस्थान जनतेसमोर येत आहे.

Web Title: UP chief minister yogi adityanath attacks on opposition over hathras case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.