अन् भर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले लव्ह यू आणि दिला फ्लाइंग किस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 13:51 IST2017-10-31T13:49:47+5:302017-10-31T13:51:00+5:30

यांच्याभोवती लोकांनी गराडा घातला असून या गर्दीतील खास व्यक्तीला ​त्यांनी फ्लाइंग किस दिला आणि सगळ्यांनाच चकित केलं.

Chief Minister said in the program "Love You" and "Flying Kiss" | अन् भर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले लव्ह यू आणि दिला फ्लाइंग किस

अन् भर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले लव्ह यू आणि दिला फ्लाइंग किस

नवी दिल्ली - अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा अजब-गजब दावा करुन चर्चेत आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एका व्हिडिओमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवराजसिंह यांच्याभोवती लोकांनी गराडा घातला असून या गर्दीतील खास व्यक्तीला ​त्यांनी फ्लाइंग किस दिला आणि सगळ्यांनाच चकित केलं.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा हा व्हिडिओ एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील अशोक नगरमधील मुंगावली या गावातील एका कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हिडिओत शिवराजसिंह यांच्याभोवती लोकांची गर्दी जमली आहे. काही लोक त्यांना चिठ्ठ्या देताहेत. या गर्दीतील एक व्यक्ती शिवराज यांना मामाजी असा आवाज देत आहे. शिवराज यांनी पाहिल्यानंतर ती व्यक्ती त्यांना आय लव्ह यू म्हणते. त्यावर शिवराजही लव्ह यू म्हणतात आणि फ्लाइंग किस देतात. त्यानंतर ते खळखळून हसायला लागले, असे या व्हिडिओत दिसते. 



 

शिवराज यांनी ज्या व्यक्तीला फ्लाइंग किस दिले, ती खास व्यक्ती कोण? अशी चर्चा आता रंगली आहे. नेटीझन्सनी यावर समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Web Title: Chief Minister said in the program "Love You" and "Flying Kiss"