फाळणीतील शहिदांचे कुरुक्षेत्रात स्मारक उभारणार, मुख्यमंत्री खट्टर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 06:31 AM2022-08-16T06:31:24+5:302022-08-16T06:31:57+5:30

Manohar Lal Khattar : मुख्यमंत्री म्हणाले की, फाळणीच्यावेळी लाखो लोक शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीमध्ये पंचनद स्मारक ट्रस्टतर्फे स्मारक उभारले जाईल. हे स्मारक देशस्तरावर ओळख निर्माण करील.

Chief Minister Manohar Lal Khattar announced that a memorial will be erected in Kurukshetra for the martyrs of Partition | फाळणीतील शहिदांचे कुरुक्षेत्रात स्मारक उभारणार, मुख्यमंत्री खट्टर यांची घोषणा

फाळणीतील शहिदांचे कुरुक्षेत्रात स्मारक उभारणार, मुख्यमंत्री खट्टर यांची घोषणा

googlenewsNext

 - बलवंत तक्षक

चंडीगड : भारत-पाकिस्तान फाळणीच्या कालावधीत शहीद झालेल्यांचे स्मारक कुरुक्षेत्रमध्ये उभारले जाणार आहे. यासाठी पिपलीजवळ सुमारे २५ एकर जमीन निश्चित करण्यात आली असून, लवकरच निर्माण कार्य सुरू केले जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. 

मुख्यमंत्री म्हणाले की, फाळणीच्यावेळी लाखो लोक शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीमध्ये पंचनद स्मारक ट्रस्टतर्फे स्मारक उभारले जाईल. हे स्मारक देशस्तरावर ओळख निर्माण करील. फाळणीच्यावेळी एक कोटी वीस लाख लोक स्थलांतरित झाले होते व लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. आपल्याला पुढे जायचे असेल तर आपला समाज, संस्कृती, बोलीभाषेला लक्षात घ्यावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. फाळणीच्या वेळी शहीद झालेल्या १,२०० जणांवरील लघु चित्रपट यावेळी दाखविण्यात आला. 

काय म्हणाले खट्टर
हरयाणाच्या भूमीने फाळणीचे दु:ख जास्तच सहन केले, असे सांगून खट्टर म्हणाले की, पाकिस्तानमधून बेघर होऊन आलेले अनेक लोक याची साक्ष देतात. मी स्वत: अशा कुटुंबांमध्ये वाढलो आहे व त्यांचे दु:ख चांगले जाणतो. फाळणीचे दु:ख कधीच विसरले जाऊ शकत नाही.

Web Title: Chief Minister Manohar Lal Khattar announced that a memorial will be erected in Kurukshetra for the martyrs of Partition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.