राजस्थानच्या विकासात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे उत्तम कार्य; डॉ. विजय दर्डा यांनी केले अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 07:57 IST2025-01-18T07:55:16+5:302025-01-18T07:57:19+5:30
‘रायझिंग राजस्थान इन्व्हेस्टमेंट समिट’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी दर्शविलेल्या कटिबद्धतेबद्दल मुख्यमंत्री शर्मा यांचे दर्डा यांनी अभिनंदन केले.

राजस्थानच्या विकासात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे उत्तम कार्य; डॉ. विजय दर्डा यांनी केले अभिनंदन
जयपूर : ‘लोकमत मीडिया समूहा’चे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची शुक्रवारी जयपूरमध्ये भेट घेतली. ‘रायझिंग राजस्थान इन्व्हेस्टमेंट समिट’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी दर्शविलेल्या कटिबद्धतेबद्दल मुख्यमंत्री शर्मा यांचे दर्डा यांनी अभिनंदन केले.
राजस्थानमध्ये जलपुरवठा आणि सिंचन यासाठी राज्य सरकारने केलेली विकासकामे तसेच जलस्रोतांची उपलब्धता वाढविणे, विद्युत उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी राजस्थान सरकारने केलेल्या प्रभावी उपाययोजनांबद्दलही या भेटीत चर्चा झाली.
आठवणींना उजाळा
‘प्रवासी’ राजस्थानी नागरिकांच्या आपल्या मातृभूमीबद्दल असलेल्या नितांत प्रेमाविषयी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या भेटीत प्रशंसोद्गार काढले. जळगाव येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात राजस्थानी नागरिकांनी दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी प्रवासी राजस्थानी दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या कार्यक्रमाकरिता केलेल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या आठवणी शर्मा यांनी या भेटीत डॉ. विजय दर्डा यांना सांगितल्या.
मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले की, राजस्थान सरकारने प्रवासी राजस्थानी नागरिकांसाठी एक स्वतंत्र खाते स्थापन केले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची जनहिताच्या कार्यासाठी असलेली कटिबद्धता व सामान्य लोकांबद्दल असलेली आपुलकी या गोष्टींची डॉ. विजय दर्डा यांनी प्रशंसा केली.