मतदार यादीतील नावे वगळण्याविरोधात मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:41 IST2026-03-07T04:41:02+5:302026-03-07T04:41:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालमधील मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर(एसआयआर) मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे वगळल्याच्या विरोधात ...

मतदार यादीतील नावे वगळण्याविरोधात मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगालमधील मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर(एसआयआर) मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे वगळल्याच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथील एस्प्लेनेड मेट्रो चॅनेलवर धरणे आंदोलन सुरू केले. एसआयआरनंतर मनमानी पद्धतीने मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करीत बॅनर्जींनी केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
बंगाली मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी भाजप व निवडणूक आयोगाने कट रचला असून, तो आम्ही उघड करणार असल्याचा दावा दुपारी सव्वादोन वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात करताना बॅनर्जींनी केला.
‘कृती राजकीयदृष्ट्या प्रेरित’
मतदारांची नावे मतदार याद्यांमधून वगळणे व त्यांना मतदानापासून वंचित ठेवणे ही निवडणूक आयोगाची कृती राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला.
६३.६६ लाख नावे वगळली
राज्यात एसआयआर प्रक्रियेत ६३.६६ लाख मतदार वगळल्याने मतदारांची संख्या ७.६६ कोटींवरून ७.०४ कोटी झाली आहे. याशिवाय ६०.०६ लाखांहून अधिक मतदारांना अंडर ॲडजूडिकेशन श्रेणीत ठेवण्यात आली आहेत.