शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Supreme Court New CJI: आताच तर आलेले...! सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपला उत्तराधिकाऱी निवडला; डी वाय चंद्रचूड वडिलांचा वारसा चालविणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 11:51 IST

Supreme Court New CJI: देशाच्या इतिहासात हा योग पहिल्यांदाच आला आहे. वडिलांनंतर त्यांचा मुलगा देखील सर्वोच्च न्यायसंस्थेचे सर्वोच्च पद सांभाळणार आहे.

महाराष्ट्राचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत हे लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यांनी आपल्या कमी कालावधीमध्ये खटल्यांच्या वेळकाढूपणावर रामबाण उपाय काढला होता. आता त्यांनी पुढच्या सरन्यायाधीशांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश असणार आहेत. 

देशाच्या इतिहासात हा योग पहिल्यांदाच आला आहे. वडिलांनंतर त्यांचा मुलगा देखील सर्वोच्च न्यायसंस्थेचे सर्वोच्च पद सांभाळणार आहे. डी वाय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड़ हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ हा २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै, १९८५ एवढा प्रदीर्घ म्हणजेच सात वर्षांचा राहिला होता. ते रिटायर झाल्यानंतर ३७ वर्षांनी त्यांचा मुलगा धनंजय यशवंत चंद्रचूड सीजेआय पदावर बसणार आहे. 

डी वाय चंद्रचूड यांनी आपल्याच वडिलांचे दोन महत्वाचे निर्णय बदलले होते. ते धडक निर्णयांसाठी देखील चर्चेत असतात. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी कायदा मंत्री किरण रिजिजू यांना चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. ९ नोव्हेंबरला नव्या सरन्यायाधीशांना शपथ दिली जाणार आहे. 

रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, त्याच्या नावाची शिफारस करण्याचे पत्र ७ ऑक्टोबरला लिहिले होते. कायदा मंत्रालयाने आग्रह केल्यानंतर नव्या सीजेआयचे नाव सुचविण्याची परंपरा आहे.  

टॅग्स :Uday Lalitउदय लळीतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड