शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचे अनोखे पर्व; प्रजासत्ताक दिनाचे १९५० पासूनचे प्रमुख पाहुणे.. जाणून घ्या एका क्लिकवर

By संदीप आडनाईक | Updated: January 27, 2025 16:18 IST

संदीप आडनाईक, उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या ...

संदीप आडनाईक, उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर२६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. म्हणून दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. १९५० पासून प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित केले जाते.देशाला ब्रिटिशांपासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा स्वतःचे स्वतंत्र संविधान नव्हते. कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. संविधान समितीने सादर केलेले देशाचे संविधान डॉ. आंबेडकर यांनी स्वीकारले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीकाठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणूनही २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. यानिमित्ताने देशात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला.दर वर्षी २६ जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्लीत भव्य संचलन होते. प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. नौदल, पायदल, वायुसेना अशा भारतीय फौजांचे वेगवेगळे सेनाविभाग यावेळी घोडदळ, पायदळ, तोफखाना, पृथ्वी, अग्नी अशी क्षेपणास्त्रे, अद्ययावत शस्त्रे, रणगाडे यांच्यासह संचलन करतात. राष्ट्रपती त्यांची मानवंदना स्वीकारतात. संचलनाबरोबरच देशातील विविध संस्कृतींची झलक असलेले प्रत्येक राज्यांचे चित्ररथही या संचलनात सहभागी होतात. १९५० पासून प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित केले जाते. भारत सरकार प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाच्या सहा महिने आधी राज्याच्या प्रमुखांना किंवा सरकारला आमंत्रण पाठवते. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना देणे आणि भारतीय संस्कृतीची विविधता आणि समृद्धी दर्शवणे हा यामागचा हेतू आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी स्वर्णिम भारत-विरासत आणि विकास" अशी संकल्पना आहे.१९५० पासूनचे हे आहेत प्रमुख पाहुणेवर्ष  - प्रमुख अतिथी - देश१९५० - राष्ट्रपती सुकर्णो, इंडोनेशिया१९५१ -राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह, नेपाळ१९५२ -कोणालाही आमंत्रण नाही१९५३ -कोणालाही आमंत्रण नाही१९५४- राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक भूतान१९५५ - गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मुहम्मद, पाकिस्तान१९५६ -प्रधानमंत्री नोबुसुके किशी, जपान१९५७ -संरक्षण मंत्री जॉर्जी झुकोव्ह, युएसएसआर१९५८ - मार्शल ये जियानिंग, चीन१९५९-ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप, युनायटेड किंगडम१९६०- राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह, सोव्हियेत संघ१९६१-राणी एलिझाबेथ दुसरी, युनायटेड किंग्डम१९६२ - पंतप्रधान विगो कॅम्पमन, डेन्मार्क१९६३ - राजा नोरोडोम सिंहनौक, कंबोडिया१९६४-चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लॉर्ड लुईस माउंटबॅटन, युनायटेड किंगडम१९६५ -खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूुल हमीद, पाकिस्तान१९६६-कोणालाही आमंत्रण नाही१९६७ -राजा मोहम्मद जहीर शाह, अफगाणिस्तान१९६८ -पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन, सोव्हियेत संघ आणि राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हिया१९६९ -पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह, बल्गेरिया१९७०- राजा बॉडोइन, बेल्जियम१९७१-राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे, टांझानिया१९७२-पंतप्रधान शिवसागर रामगुलाम, मॉरिशस१९७३-राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको, झैर ध्वज झैर१९७४-राष्ट्रपती मार्शल जोसेफ ब्रॉझ टिटो ,युगोस्लाव्हिया आणि पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके, श्रीलंका१९७५-राष्ट्रपती केनेथ कॉंडा, झांबिया१९७६-पंतप्रधान जाक शिराक, फ्रान्स१९७७-प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक,पोलंड१९७८ -राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरी, आयर्लंडचे प्रजासत्ताक,१९७९-पंतप्रधान माल्कम फ्रेझर, ऑस्ट्रेलिया१९८०-राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें, फ्रान्स१९८१ -राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो, मेक्सिको१९८२-राजा हुआन कार्लोस पहिला, स्पेन१९८३-राष्ट्रपती शेहु शगारी, नायजेरिया१९८४-राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक, भूतान१९८५-राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन,आर्जेन्टिना१९८६-पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीस१९८७-राष्ट्रपती ॲलन गार्शिया,पेरू१९८८-राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने, श्रीलंका१९८९-जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह, व्हियेतनाम१९९०-पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ, मॉरिशस१९९१-राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम, मालदीव१९९२-राष्ट्रपती मारिओ सोआरेस, पोर्तुगाल१९९३-पंतप्रधान जॉन मेजर,युनायटेड किंग्डम१९९४-पंतप्रधान कोह चोक थोंग, सिंगापूर१९९५-राष्ट्रपती नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिका१९९६-राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो, ब्राझील१९९७-पंतप्रधान बसदेव पांडे, त्रिनिदाद आणि टोबॅगो१९९८-राष्ट्रपती जॅक शिराक, फ्रान्स१९९९-राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव, नेपाळ२०००-राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो, नायजेरिया२००१-राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका,अल्जीरिया२००२-राष्ट्रपती कस्साम उतीम, मॉरिशस२००३-राष्ट्रपती मोहम्मद खातामी, इराण२००४-राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा, ब्राझील२००५-राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक, भूतान२००६-देशध्वज अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद, सौदी अरेबिया२००७-राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन, रशिया२००८-राष्ट्रपती निकोला सार्कोझी, फ्रान्स२००९-राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव, कझाकस्तान२०१०-राष्ट्रपती ली म्युंग बाक, दक्षिण कोरिया२०११-राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो, इंडोनेशिया२०१२-पंतप्रधान यिंगलक शिनावत, थायलंड२०१५-राष्ट्रपती बराक ओबामा, अमेरिका२०१६-राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद, फ्रान्स२०१७-राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, संयुक्त अरब अमिराती-२०१८ : सुलतान हसनल बोलकिया, ब्रुनेई, पंतप्रधान हुन सेन, कंबोडिया, राष्ट्राध्यक्ष, जोको विडोडो, इंडोनेशिया, पंतप्रधान थोंग्लोन सिसोलिथ, लाओस, पंतप्रधान नजीब रझाक, मलेशिया, राज्य सल्लागार आंग सान स्यू की, म्यानमार, राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो रोआ दुतेर्ते, फिलिपाइन्स, पंतप्रधान ली सिएन लूंग, सिंगापूर, पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा, थायलंड, पंतप्रधान गुयेन जुआन फुक, व्हिएतनाम. ( १० आशियान देशांचे प्रमुख)-२०१९ : राष्ट्रपती सिरिल रामफोसा, दक्षिण आफ्रिका-२०२० : राष्ट्रपती जैर बोल्सोनारो, ब्राझील-२०२१ : पंतप्रधान बोरिस जॉन्सन, युनायटेड किंगडम-२०२२ : कोरोनामुळे कोणालाही आमंत्रण नाही-२०२३ : इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी-२०२४ : फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅकरॉन-२०२५ : इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Indiaभारतdelhiदिल्लीIndonesiaइंडोनेशिया