भूपेश बघेलांच्या मुलाला वाढदिवशीच ईडीकडून अटक; माजी मुख्यमंत्री म्हणाले, "ही भेट कायम लक्षात राहील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:33 IST2025-07-18T15:22:14+5:302025-07-18T16:33:32+5:30

ED arrests Chaitanya Baghel: अंमलबजावणी संचालनालयाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला भिलाई येथून अटक ...

Chhattishgarh Bhupesh Baghel son Chaitanya arrested by ED | भूपेश बघेलांच्या मुलाला वाढदिवशीच ईडीकडून अटक; माजी मुख्यमंत्री म्हणाले, "ही भेट कायम लक्षात राहील"

भूपेश बघेलांच्या मुलाला वाढदिवशीच ईडीकडून अटक; माजी मुख्यमंत्री म्हणाले, "ही भेट कायम लक्षात राहील"

ED arrests Chaitanya Baghel: अंमलबजावणी संचालनालयानेछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला भिलाई येथून अटक केली आहे. मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चैतन्य बघेलला अटक करण्यात आली आहे. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने शुक्रवारी चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानी नवीन छापे टाकले. या प्रकरणात नवीन पुरावे सापडल्यानंतर, ईडीने भिलाई येथील चैतन्य बघेल यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना अटक केली. महत्त्वाची बाब म्हणजे वाढदिवशीच चैतन्य बघेल यांना अटक करण्यात आली.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ईडीने अटक केल्यानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात छापे टाकल्यानंतर चैतन्यला अटक करण्यात आली. योगायोगाने, आज चैतन्यचा वाढदिवस देखील आहे. नवीन पुरावे मिळाल्यानंतर ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरात असलेल्या भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी छापा टाकला.

माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवशी ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी भेट त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, असं म्हटलं. "मोदी आणि शहा यांनी दिलेल्या भेटवस्तू जगातील कोणत्याही लोकशाहीत कोणीही देऊ शकत नाही. माझ्या वाढदिवशी, दोन्ही अत्यंत आदरणीय नेत्यांनी माझ्या सल्लागाराच्या आणि दोन ओएसडींच्या घरी ईडी पाठवले होते. आणि आता माझा मुलगा चैतन्यच्या वाढदिवशी, ईडीची टीम माझ्या घरावर छापा टाकत आहे. या भेटवस्तूंसाठी धन्यवाद. मी त्या आयुष्यभर लक्षात ठेवेन," असं भूपेश बघेल म्हणाले.

दरम्यान, छत्तीसगड दारू घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. ईडीने एसीबीमध्ये एफआयआर दाखल केला आहे. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की हा घोटाळा २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ईडीला तपासात आढळलं की, हा घोटाळा तत्कालीन भूपेश सरकारच्या काळात आयएएस अधिकारी अनिल तुतेजा, उत्पादन शुल्क विभागाचे एमडी एपी त्रिपाठी आणि उद्योगपती अन्वर ढेबर यांच्या सिंडिकेटद्वारे करण्यात आला होता.

Web Title: Chhattishgarh Bhupesh Baghel son Chaitanya arrested by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.