कोंबडीचं जिवंत पिल्लू गिळल्यानं तरुणाचा गुदमरून मृत्यू; पिल्लू मात्र सुखरूप! डॉक्टरही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:26 IST2024-12-17T20:26:04+5:302024-12-17T20:26:42+5:30
यासंदर्भात बोलताना शवविच्छेदन करणारे डॉ. संतू बाग म्हणाले, "मी माज्या कारकिर्दीत 15,000 हून अधिक पोस्टमॉर्टेम केले आहे. मात्र, अशी केस पाहिल्यांदाच बघत आहे.

प्रतिकात्मक फोटो
छत्तीसगडमधील अंबिकापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कोंबडीचे जिवंत पिल्लू गिळल्याने एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विचित्र गोष्ट म्हणजे संबंधित पिल्लू मात्र सुखरूप आहे. महत्वाचे म्हणजे, या घटनेने वैद्यकीय तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, यासंदर्भात बोलताना शवविच्छेदन करणारे डॉ. संतू बाग म्हणाले, "मी माज्या कारकिर्दीत 15,000 हून अधिक पोस्टमॉर्टेम केले आहे. मात्र, अशी केस पाहिल्यांदाच बघत आहे. या संपूर्ण प्रकाराने आम्हा सर्वांना चकित केले आहे." तर ग्रामस्थांनी ही घटना तंत्र-मंत्राशी संबंधित असावी, असे म्हटले आहे.
आनंद यादव असे मृताचे नाव आहे. तो छिंदकालो गावचा रहिवासी आहे. त्याला बेशुद्धावस्थेत अंबिकापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आंघोळीच्या, काही वेळानंतर आनंदला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला होता.
शवविच्छेदनादरम्यान, डॉक्टरांना आनंदच्या शरीरात कोंबडीचे जिवंत पिल्लू आढळले. डॉ. बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सेमी लांबीचे हे पिल्ली असा पद्धतीने अडकले होते की, आनंदची श्वास नलिका आणि अन्न नलिका दोन्ही ब्लॉक जाल्या. यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झला.
दरम्यान, आनंदला मूल होत नव्हते. यामुळे संतती प्राप्तीसाठी त्याने तांत्रिकाच्या सांगण्यावरून, असे कृत्य केले असावे, अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.